Advertisement

एकच मिशन जुनी पेंन्शन....मोखाड्यात शिक्षक आक्रमक

सरकारच्या नव्या जीआरची केली होळी 

पालघर : सौरभ कामडी 
                     महाराष्ट्र राज्यातील सर्व संवर्गातील राज्य सरकारी,निमसरकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,जिल्हा परीषद कर्मचारी ,कंत्राटी कर्मचारी,संगणक हाताळणारे कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी दोन दिवसांपासुन विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले असतानाच मोखाडा तालुक्यात या आंदोलनाने मोठे स्वरूप प्राप्त केले असून या आंदोलनात शिक्षक समन्वय समिती शंभर टक्के सामील झाल्याने अनेक शाळाना टाळे लागले आहे विविध मागण्यांबरोबरच जुनी पेन्शन योजना लागू करावी हि प्रमुख मागणी या आंदोलनाची आहे यामध्ये तालुक्यातील सर्व कार्यालयांचे कर्मचारी सहभागी झाल्याने शाळा आणि कार्यालये ओस पडली आहेत. 
                   राज्यभर हे आंदोलन सुरू झाल्याने कार्यालये तसेच बंद पडलेल्या शाळा यांसंदर्भात विद्यार्थ्यांचे नुकसान आणि लोकांचे नुकसान होवू नये म्हणून अंशकालीन किंवा कंत्राटी कामगार भरण्याचा विषयी हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी या सरकारने तातडीने काहि जीआर काढले होते या जी आरची सुद्धा होळी यावेळी या आंदोलकांकडुन करण्यात आली.यावेळी जुनी पेन्शन पुन्हा लागू करावी या प्रमुख मागणी शिवाय कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देवून त्यांच्या सेवा नियमित करा.सर्व रीक्त पदे आरोग्य विभागास अग्रक्रमाने ठरवून तात्काळ भरा तसेच चतुश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तात्काळ हटवा.
     अशा जवळपास १७ मागण्या यावेळी आंदोलकांनी केला असून मोखाडा कर्मचाऱ्यांनी शहरातून भव्य रॅली काढून तहसील कार्यालय मोखाडा येथे ठीय्या आंदोलन सुरू केले आहे यावेळी सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आपली मनोगत व्यक्त करीत जुनी पेन्शन योजना लागु करावी अशी मागणी लावून धरत आता माघार नाहीच अशी भूमिका घेतली आहे.

Post a Comment

0 Comments