Advertisement

शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या प्रकरणाची आमदाराने मांडली विधानसभेत लक्षवेधी सूचना

आदिवासी जनतेत असंतोषाचे वातावरण व नाराजीची भावना; अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची आमदाराची विधानसभेत मागणी

रत्नागिरी: आदिवासी शिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरामजी कोरोटे यांनी दिनांक 10 मार्च रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श शाळा सुकदर येथील आदिवासी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना राष्ट्रीय कलामित्र व इंटरनॅशनल आयडॉल अवार्ड पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.मात्र तेथील विजय दाजी बाईत प्रभारी गटशिक्षण अधिकारी खेड यांच्या विरोधातल्या चौकशीच्या अनुषंगाने मनमानीपणे सेवेतून निलंबित करण्यात आले,या अन्यायाविरोधात शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आतापर्यंत 435 वेळा उपोषण केले आहे,अर्ज करणे,तरीही त्यांना पुन्हा सेवेत न घेणे,त्यांना नोकरीपासून वंचित ठेवणे,याशिवाय त्यांना बनावट गुन्ह्यात अडकवणे,या अन्यायाच्या विरोधात ते सतत आवाज उठवत असतानाही त्याबाबत शासन प्रशासन दाखवत असलेली अनास्था परिणामी राज्यातील आदिवासी जनतेत पसरलेले असंतोषाचे वातावरण व नाराजाची भावना त्यामुळे शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून सदर अधिकाऱ्यांवर करावयाची कारवाई व याबाबत राज्यशासनाची प्रतिक्रिया ,अशी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी मांडली.
                      शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी याबाबत माहिती घेतो,चौकशीत अधिकारी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, आदिवासी शिक्षकाला न्याय देण्यात येईल.अशी शासनाच्या वतीने प्रतिक्रिया दिली.त्यामुळे खेडचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी विजय बाईत व प्रकरणासंबंधीत अधिकाऱ्यांवर शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते? याकडे लक्ष लागून आहे.
             दरम्यान शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन विधानसभेसमोर दिनांक 9 मार्च रोजी उपोषण छेडले. विजय बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी,नंदलाल शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी व एकनाथ आंबोकर तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी व 2 मूळ कागदपत्रासह 2 लाख रूपये दंड देण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments