Advertisement

जिल्ह्यातुन अक्कलकुवा पोलीस निरीक्षकांची हकालपट्टी करा-बिरसा फायटर्स

तळोदा(प्रतिनिधी)जिल्ह्यातुन अक्क्कलकुवा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांची चौकशी करून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी बिरसा फायटर्सने पोलीस निरीक्षक तळोदा यांच्यामार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन पाठवून केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की,अक्कलकुवा तालुक्यातील एका गावातील मुलीला पळवून नेल्याबद्दल पोलीस स्टेशनाला तक्रार दिली होती.पोलिसांनी शोध लावून मुलीला नंदुरबार येथे नेण्यासाठी बोलवले.त्यावेळी मुलींचा कुटुंबीय व ग्रामस्थांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनाला का सुपूर्द करत नाही असा प्रश्न उपस्थित केला असता;त्यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी अपशब्द वापरले.सामान्य माणूस न्याय मिळावा म्हणून तक्रार घेऊन येतात.मात्र,एक जनतेचा रक्षकच जर सामान्य लोकांना अपशब्द वापरत असेल तर फार दुर्दैवी बाब आहे.
संबंधित पोलीस अधिकारी धडगांव व शहादा तालुक्यात असतांनाही अनेक तक्रारी होत्या.त्यांच्याविरोधात सामान्य लोकांच्या वारंवार तक्रारी असतांना देखील संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई न करता पाठीशी घातले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.फक्त,जिल्ह्यात तालुका बदली तेवढी केली जात आहे.धडगांव येथे असतांना एका सिकलसेल महिलाला या अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती.पोलीस निरीक्षकांची सखोल चौकशी करून कारवाई करावी.व तात्काळ जिल्ह्यातुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्स राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,सहसंघटक कालुसिंग पावरा,सहसचिव सतीश पाडवी,गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी,रोशन ठाकरे,रघुसिंग पावरा,सावन पावरा,विलास पावरा,दिलीप पावरा आदी.बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments