Advertisement

कुणबी समाजाच्या समस्या सोडवणार:जिल्हाध्यक्ष विकास जाधव

25 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडी तर्फे कुणबी समाज उन्नती हक्क परिषद

दापोली: गेली 2 वर्षे आम्ही उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष या नात्याने विविध स्तरांवर काम करत आहोत.वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या अडी अडचणी सोडवत असताना,त्यांचे विविध समस्या प्रश्न समजून घेवून, त्यावर चर्चा व विचार विनिमय करून, त्यांच्या सर्व अन्याय अत्याचाराला शासन दरबारी वाचा फोडून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करीत आहोत. नव्हे तर ब-याच अंशी सर्व ग्रामस्थांना न्याय देण्याचे काम मी व माझे सहकारी करीत आहोत.
                  उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून, त्यांचे स्थानिक स्तरावर असणारे प्रश्न उदा.त्यांचे सुख दु:ख, विविध अडी अडचणी, शासनामार्फत शेतक-यांना मिळणा-या विविध योजनेचा लाभ, स्थानिक राजकीय सामाजिक नेत्यांकडून मिळणारी अपमानकारक वागणूक ,आंब्याला काजूला योग्य भाव, शालेय विद्यार्थ्यांच्या सुखसोई तसेच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारीचा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केमिकल कंपनी रासायनिक दुषित पाणी नद्यांमध्ये सोडतात तसेच वायुप्रदूषण करत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वसन विकार,हृदयविकार इत्यादी भयानक जीव घेणे आजार होत आहेत. इत्यादी समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सर्व कुणबी बंधू भगिनींचे असे मत आहे की,आमच्या समाजाचे नेतृत्व करण्यासाठी व त्यांना शासन प्रशासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये कुणबी समाज उन्नती हक्क परिषद घेण्यात यावी.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खितपत पडलेला जमीन कुळ वहिवाटीनुसार कुळ कायद्यांतर्गत सर्वच बाबतीत ओबीसीना 52% आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच उच्च वर्णीयांना वेगळा न्याय व कुणबी समाजाला वेगळा न्याय हा भेदभाव संपविण्यासाठी सर्व कोकण वासियांच्या अपेक्षेकरिता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर कुणबी समाज उन्नती हक्क परिषदेत शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी उपस्थित राहणार आहेत. 
                  डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी 16 मे 1938 साली खेर्डी हत्ती माळावर खोती प्रकरणाबाबत कुणबी समाजासाठी प्रथमच परिषद घेतली होती.त्यानंतर आजतागायत कोणीही कोकणवासीयांच्या न्याय हक्कांसाठी तसा आवाज उठवलेला नाही. आपण आयोजित केलेली कुणबी हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी तसेच सदर लढा बुलंद करण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता रामपूर राम मंदिर गुढे फाटा,चिपळूण गुहागर हायवे चिपळूण येथे कुणबी समाज उन्नती हक्क परिषद आहे. जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments