Advertisement

शाळा नव्हे .. स्वर्ग जणू..

मोखाड्यातील कोचाळे प्राथमिक शाळा ठरतेय आकर्षण
किशोरवयीन मुलींसाठी 'रेस्ट रुम' तयार केलेली जिल्ह्यातील पहिली जिप शाळा 
यांचा तारपा नाच जिल्ह्यात अव्वल,शिक्षकांनाही ड्रेसकोड

पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी 
 
                   जव्हार: आजच्या सरकारी शाळांची खालावत चाललेली शिक्षण पद्धती,स्वतः शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचाच स्वतःच्या शिक्षणासावर भरवशा नसल्याने पाल्यांच्या चांगल्याशिक्षणाच्या नावाखाली होणारे स्थलांतर याशिवाय पालकांचा खासगी शाळांकडे वाढत चाललेला कल, अधिक महाग झालेले शिक्षण,जिल्हा पऱीषदेच्या शाळांतील कमी होत असलेली पटसंख्या यासगळ्या परीस्थिती मोखाडा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या कोचाळे यागावातील जिल्हा परीषदेची शाळा एक नवा आदर्श निर्माण करीत असून सध्या हि शाळा सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरत असून येथील शिक्षकांच्या मेहनतीमुळे शाळा नव्हे ..... स्वर्गच जणू असे वाटावे तसेच आल्हाददायक वातवरण याशाळेच्या छोट्याशा मात्र सुंदर परीसरात प्रवेश करताच वाटते.यामुळे शाळा हि सरकारी,खासगी, खराब,भारी अशी नसते तर तेथे काम करणाऱ्या यंत्रणा कसे काम करतात यावर शाळेची विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरत असते.
Hide quoted text
          मोखाडा तालुक्यातील कोचाळे हे गांव तालुका मुख्यालयापासुन तब्बल ३० ते ३५ किमी लांब आहे याठिकाणी जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा असून याठीकाणी १ ते ८ च्या वर्गात एकूण १२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.६ ते ८ वर्गातून एकूण ४६ या किशोरवयीन मुली आहेत हे सगळ वर्णन सर्वच शाळांचे करता येईलमात्र या शाळेला आदर्श शाळा का म्हणाव याची प्रचीती याशाळेत गेल्याशिवाय कळणार नाही कारण अगदी छोट्याशा जागेत वर्गखोल्या कार्यालय याच बरोबर आहे रेस्टरुम या रेस्टरुमची संकल्पना यासाठी आहे कि किशोर वयीन मुलींना मासिकपाळीच्या काळात होणाऱ्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी एक सुंदर खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये दोन पलंग पंखे सुंदर सजावट वॉश बेसीन आवश्यक पावडर क्रीम अशी व्यवस्था आहे सर्वात महत्वाचे म्हणजे याकाळात अत्यावश्यक असलेल्या सॅनेटरीपॅड उपलब्ध करणारे मशीन आहेत आहे तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठीचीही मशीन या रुमध्येच उपलब्ध आहे खरतर मोठ्या आश्रमशाळांत किंवा जिथे किशोर वयीम मुलींची संख्या लक्षणीय आहे त्याठिकाणीही अशी व्यवस्था दुर्लक्षित राहिलेली आहे बर या रेस्ट रुमचा याव्यतिरिक्त जर एखादा विद्यार्थी आजारी पडला अशा वेळी आई वडील शेताच्या किंवा मजुरीच्या कामाला जात असतात.त्यामुळे घरी कोणीच नव्हते अशा विद्यार्थ्यांनाही विश्रांतीसाठी या रुमचा वापर होतो.यामुळे अशा रेस्ट रुमची व्यवस्थाकरणारी पालघर जिल्ह्यातील पहिली जिप शाळा कोचाळे ही बनली आहे. 
            याशिवाय शाळेच्या परीसरात परसबाग आहे,कंपोस्ट खत बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे हातधुण्यासाठी पिण्याच्यापाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.बगीचा फुलबाग तर याशाळेच्या वातावरणात अधिक भर पाडते.याशाळेतील विद्यार्थ्यांचा स्पेशल तारपानाच हा जिल्ह्यात अव्वल आहे.दिवसभरातील शिक्षणाने मुले कंटाळलीतर सर्व मुलांना एकच गीत एकता यावे किंवा काहि सुचना करण्यासाठी संगीतनय वातावरण निर्माण व्हावे यासाठी याशाळेच्या सर्व परीसरात स्पीकर लावून अतिशय सुंदर व्यवस्था निर्माण केली आहे.एवढेच काय तर बदक सुद्धा शाळे मार्फत पाळण्यात आले आहेत.संपूर्ण परीसरात सीसीटीव्हीची व्यवसथा करण्यात आली आहे दर शनिवारी दफ्तरविना शाळा हा उपक्रम येथे राबण्यात येतो.भाषिक कौशल्य ईंग्रजी कौशल्य वारली पेंटींग कागदकाम विविध भाषणे आदि शालेल शिक्षणाच्या पलीकडचे शिक्षणही येथे देण्यात येते याशाळेच्या कोणत्याही कामांत येथील ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग असतो असे येथील मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांनी दै पुढारीशी बोलताना सांगितले मुळात विद्यार्थ्यांना गणवेशाचे महत्व अधिक प्रभावी पटवून देण्यासाठी येथील शिक्षकांनीही आपला एक ड्रेसकोड तयार केला आहे.याशिवाय शाळेंची संपूर्ण विद्युत व्यवस्था स्वतःच्या सौरप्रक्ल्पावरच चालते हे ही अतिशय महत्वाचे आहे
        एकुणच काय तर आजच्या जिल्हा परीषदांच्या शाळांची अवस्था बिकट होत असताना येथील मुख्याध्यापक दिनकर फसाळे आणि राजाराम जोशी गणेश, दिनेश ठोंबरे या शिक्षकांनी आपल्या नौकरीच्या पलीकडे एक कर्तव्य म्हणून एक आदर्श शिक्षणाचा मोट बांधली आहे.याबद्दल यांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजुन बळ हवय याठिकाणी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांसाठी एक डायनिंग हॉलही तयार करण्याचा त्यांचा मानस असून यासाठी स्वयंसेवी संस्था किंवा शासन यांच्या मदतीची अपेक्षा यांना आहे.खरतर ईच्छाशक्ती असल्यासे शाळेचा स्वर्ग कस होवू शकतो हे पहावयाचे असल्यास याशाळेला नक्की भेट द्यावी अशीच स्थिती याठीकाणी आहे.

Post a Comment

0 Comments