Advertisement

पत्रकाराची हत्या ही लोकशाहीची हत्या: सुशिलकुमार पावरा

पत्रकार शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरणी दापोली पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दापोली :राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणी करिता दापोलीतील तमाम पत्रकार एकवटले असून त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले.
                   राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा नुकताच अपघातात संशयास्पद मृत्यू ओढवला. यामुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी याकरिता जिल्ह्यातील पत्रकार एकवटले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज दापोलीतील तमाम पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसीलदार कार्यालय असा मूक मोर्चा काढला व तहसीलदार यांना निवेदन सादर केले व शशिकांत वारीसे यांच्या संस्थास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्याची व दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची विनंती केली
                    यावेळी पत्रकार शैलेंद्र केळकर, मनोज पवार, जगदीश वामकर, प्रवीण शिंदे, शिवाजी गोरे, मंगेश शिंदे, राजेश लिंगायत, शशिकांत राऊत, प्रसाद रानडे यांच्यासह सुशीलकुमार पावरा, आनंद करमरकर, प्रशांत कांबळे, अजित सुर्वे, सिद्धेश शिगवण, विद्यमान गुरव यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
                  आमचे पत्रकार बंधू शशिकांत वारिशे यांचा अपघात झाला नसून हा घातपात करण्यात आला आहे,खून करण्यात आला आहे.या घटनेचा दापोली पत्रकार बांधवांकडून आज तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.संशयीत आरोपीवर तसेच ज्यांनी कुणी हा घातपात घडवून आणला आहे,त्या आरोपींवर पत्रकार कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी,जेणेकरून पत्रकारांवर वारंवार होणारे असे भ्याड हल्ले थांबले पाहिजेत. पत्रकाराची हत्या ही एक प्रकारची लोकशाहीची हत्याच आहे.निषेध असो ,निषेध असो,पत्रकार हल्ल्याचा निषेध असो! अशी प्रतिक्रिया देत सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments