Advertisement

कुळाबाबत प्रशासनाने तात्काळ न्याय द्यावा,अन्यथा उग्र आंदोलन छेडणार:महाळूंगे ग्रामस्थांचा इशारा

आम्हाला उदरनिर्वाहासाठी जमीन नाही,कुणाचाही आधार नाही,आम्ही जगायचे कसे?: वयोवृद्ध राणे दाम्पत्य

दापोली:गेली 50 वर्षे आम्ही जमिन कसत आहोत.त्या 3 एकर जमिनीला कुळ लावण्यात आले आहे.जमिनीचे मूळ मालक मंदार मदन जाधव हे असून तसा वारस तपासाचा हायकोर्टाचा दाखला आहे. आडनावाचा फायदा घेऊन चंद्रकांत महादेव जाधव यांनी खोटे पुरावे दाखल करुन सदर जागेवर वारस लावण्याचा प्रयत्न करीत आहे.आमच्या जागेतील काजू काढून नेतात व धमकी देतात. मंदार मदन जाधव हे हायकोर्टात वारसदार सिद्ध झाले.त्यांनाही हायकोर्टात चंद्रकांत जाधव यांनी चॅलेंज केले आहे.तो दावा प्रलंबित आहे.सन 2013 पासून दावा सुरू आहे.गट क्रमांक 79 मध्ये दोन कूळ आहेत. त्यापैकी 3 एकरला नामदेव कारंडे यांचे कूळ लावून 7/12 वेगळा झाला.उर्वरित 3 एकरला तहसीलदार यांनी स्थगिती आणली आहे.असा आरोप सूर्यकांत भिकाजी देवघरे राहणार महाळूंगे देवघरेवाडी यांनी केला आहे.
                गट क्रमांक 28 जमिनीवरील कूळ प्रकरणाच्या वेळी आम्ही मुंबईला डोळ्याच्या ऑपरेशन साठी गेलो होतो.आम्हाला 5 मुली आहेत.मूली लग्न होऊन सासरी राहतात. आम्हाला 2 बहिणी आहेत. त्यापैकी अनिता विठोबा जाधव ही मयत झाली आहे.तरी मयत व्यक्तीच्या नावे दिशाभूल करून नोटीस पाठवली जाते .वत्सला अनंत कदम ह्या हयात असून गांव टांगर तालुका दापोली येथे राहतात.त्यांना महसूल विभाग नोटीस देत नाहीत. 12 एकर जमिनी पैकी 16 गुंठे वर कुळ लागलय. गोविंद नारायण राणे,उमा विनय तांबे,मनोहर लक्ष्मण पडाळकर हे खरेदीखतवाले आहेत.आमच्या जमिनीवर कूळ लावण्यात येत आहे,आमच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात येत आहे,आम्ही या वयात कुणाकडे जायचे? कुणाकडे न्याय मागायचा?आम्हास उदरनिर्वाहासाठी जमीन नाही,आम्हाला कुणाचाही आधार नाही,आम्ही कसे जगायचे? अशी व्यथा अन्याय ग्रस्त वयोवृद्ध दाम्पत्य श्री. महिपत श्रीपत राणे वय 65 व सौ.अरूणा महिपत राणे वय 60 यांनी मांडली आहे.
                        महादेव रणछोड मेहता,अशोक शिवराम कदम,प्रविण विष्णू रूके,रमेश पांडुरंग रूके,अनंत पांडुरंग रूके,प्रभाकर पांडुरंग रूके,सविता शंकर रूके,आकेश दशरथ रूके,राजेश्री दशरथ रूके,रजनी दशरथ रूके,सुजाता दशरथ रूके,जयश्री जयराम मोहिते,रेश्मा राजेंद्र सकपाळ, रेखा रवींद्र येलवे, सुनिल बाळाराम गमरे,माला प्रभाकर गायकवाड, विलास सुडकोजी रूके,इंदूमती दगडू मोरे ,कुंदा दादू जाधव,सुनिता काशीराम जाधव, प्रमिला प्रकाश महाडिक, राजश्री राजू कदम,अरविंद सुडकाजी रूके ,सुधीर जगन्नाथ रूके,सुभाष जगन्नाथ रूके,विकास जगन्नाथ रूके,शांताबाई जगन्नाथ रुके,शोभा रामजी जाधव, सुनिता सुनिल रूके,आशा कमलाकर मोरे,अनिकेत सुनिल रूके,दामोदर मोतीराम रूके,अक्षय सुनिल रूके,सुशिला विठ्ठल जाधव, अरूण विठ्ठल जाधव, शरद विठ्ठल जाधव, ज्योती विठ्ठल जाधव, विठ्ठल शिवराम जाधव इत्यादी भोगवटादारांची नावे असून शेताचे सामाईक क्षेत्र असे गाव नमुना सात बारा वर तलाठी सजा पिसई यांनी दिलेल्या दाखल्यावर उल्लेख करण्यात आलेला दिसून येतो.वरील भोगवटादारांपैकी सुभाष जगन्नाथ रूके यांनी दापोलीचे तहसीलदार यांना दिनांक 26/12/2022 रोजीच्या अर्जान्वये जमीन बाबत हरकत नोंदवली आहे. तहसीलदार दापोली यांनी दिनांक 12/1/2023 च्या पत्रानुसार गोविंद नारायण राणे जमीन मालक यांना दिनांक 24/1/2023 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टाद्वारे नोटीस पाठवली होती.सदर नोटीस आपल्याला 25/1/2023 रोजी प्राप्त झाल्याचे तहसीलदार यांना गोविंद राणे यांनी निदर्शनास आणून दिले.त्यावर तहसीलदार यांनी पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.महिपत श्रीपत राणे जमीन मालक यांनी तहसीलदार दापोली यांना दिनांक 27/12/2022 रोजीच्या अर्जान्वये गट क्रमांक 28 मध्ये कुळाची खरेदी न होणेबाबत अर्ज दाखल केला आहे.महसूल विभागाने पत्यक्षात जमिनीची पाहणी न करता,सहानिशा न करता,जमिन मालकांना न कळवता व जमीन मालकाची बाजू समजून न घेता झटपट एकतर्फी निर्णय दिला आहे.असाही आरोप जमिन मालकांनी केला आहे.तहसीलदार दापोली यांनी दिलेल्या आदेशाला उपविभागीय अधिकारी दापोली यांच्याकडे आम्ही अपिल दाखल केले आहे.आमच्या जमिनीवर कुळ लावण्याचा प्रयत्न श्रीम. चंद्रकला चंद्रकांत जाधव ह्या करीत आहेत. असा आरोप प्रकरणांसंबंधित सामनेवाले महाळुंगे ग्रामस्थांनी केला आहे.
                आज आम्ही महाळूंगे बौद्धवाडी व देवघरेवाडीतील अन्यायग्रस्त ,सर्व ग्रामस्थांवर जो अन्याय होतोय ,त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही ग्रामस्थ व शेतकरी उभे ठाकले आहोत.आम्ही शासनाला व तहसीलदार, पोलीस प्रशासनाला विनंती करतो की,आमच्यावर कुळाच्या बाबतीत श्रीम.चंद्रकला चंद्रकांत जाधव अर्जदार यांच्याकडून जो काही अन्याय होत आहे.त्यावर लवकरात गांवक-यांना न्याय देण्याची कार्यवाही करावी.नाहीतर आम्ही नाईलाजाने पुढचे पाऊल उचलणार आहोत,गावकरी उग्र आंदोलन करणार आहोत. प्रशासनाने याची नोंद घ्यावी,असा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments