Advertisement

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्रा. प. क्रांतीज्योती महिला सदस्य व ग्रा. प.सदस्यांचे पालघर उमरोली माहीम येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन.

पालघर :सौरभ कामडी 

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग ,यशदा पुणे प्रस्तावित गोखले एज्युकेशन सोसायटीचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कोसबाड तालुका डहाणू व जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 जानेवारी ते 8 जानेवारी २०२३ दरम्यान पंचायत समिती पालघर उमरोली माहीम पालघर जिल्हा परिषद संकुल, उमरोली ग्रामपंचायत, माहीम ग्रामपंचायत पालघर तालुका अंतर्गगत क्रांतीज्योती ग्रामपंचायत महिला सदस्य व ग्रामपंचायत पुरुष सदस्य यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले आहे .या शिबिरामध्ये उद्घाटनाप्रसंगी पंचायतराज प्रशिक्षण केंद्र कोसबाड प्राचार्य जयराम पाटकर ,पंचायत समिती पालघर गटविकास अधिकारी रेवणकर सर, विस्तार अधिकारी विनोद पाटील सर,अमृत उमतोल सर पेसा समन्वयक,प्रवीण प्रशिक्षक, विजय पाटील, पंजाबराव घ्यारे, नारायण दे सले विजय आंबात विशाखा वानखेड, अश्विनी घरत ,राहुल ठाकूर सर , ग्रामपंचायत विस्तारअधिकारी सुनील पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती सुरुवात झाली.या त्यानंतर पहिल्या दिवशी मास्टर ट्रेनर प्राचार्य जयराम पाटकर, अमृत उमतोल सर, पेसा समन्वयक राहुल ठाकूर, प्रवीण प्रशिक्षक, विजय पाटील, नारायण दिसले, पंजाबराव घ्यारे, विजय आंबात, विशाखा वानखेड, अश्विनी घरात यांनी ग्रामसभा, मासिक सभा, वार्ड सभा, महिला सभा, स्थानिक स्वराज्य संस्था कामकाज ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरपंच व सदस्यांचे जबाबदारी व कर्तव्य, ग्रामपंचायतचे दप्तर एक ते 33 नमुने इत्यादी पहिल्या दिवसांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.

Post a Comment

0 Comments