Advertisement

गजानन सामाले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

दापोली प्रतिनिधी: सुशिलकुमार पावरा

दापोली: दापोली तालुका कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या शिवजयंती उत्सव आणि अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा गटविकास अधिकारी आर.एम.दिघे यांचे अध्यक्षतेत आणि रत्नागिरी रायगड चे खासदार सुनिल तटकरे तसेच दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम यांचे प्रमुख उपस्थितीत आज १९ फेब्रु. रोजी रसिकरंजन नाट्यमंदिर दापोली येथे संपन्न झाला.
                यामध्ये तालुक्यातील कुडावळे भोईद या आदिवासी वाडीवरील शाळेत ज्ञानदान करीत असलेले गजानन विजयकुमार सामाले यांना आमदार योगेश कदम यांचे हस्ते आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ज्या शाळेत मुलांपेक्षा गुरेच जास्त वावर करायची अशा शाळेत शुन्यातून विश्व निर्माण करावे तसे गजानन सामाले यांनी आमुलाग्र बदल केलेला आहे.
त्यांचे शाळेचे वैशिष्ठ्ये म्हणजे विद्यार्थी गळती शून्यावर असून शाळेला सुट्टी असेल तरीही मुले शाळेतच असतात.
म्हणजेच गुरांच्या गोठ्याचे रुपांतर त्यांनी आदर्श शाळेत केलेले आहे.
                यासाठी गटशिक्षणअधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्तार अधिकारी सुनिल सावंत, केंद्रप्रमुख धनंजय शिरसाट आणि शीतल गिम्हवणेकर यांचे मार्गदर्शन तर गूंज फाऊंडेशन आणि आदिवासी वाडी व भोईडवाडीवरील ग्रामस्थ व पालक यांचे सहकार्य लाभल्याचे गजानन सामाले यांनी सांगितले. गजानन सामाले हे इंग्रजी विषयात निपूण असून,आत्तापर्यंत त्यांनी अनेकवेळा शिक्षकप्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून काम केले आहे तर ऑनलाईन कामात केंद्रासह तालुक्याच्या 
सर्व कार्यात तंत्रस्नेही म्हणूनही ते कार्यभार सांभाळत आहेत.
गजानन सामाले यांना मिळालेल्या पुरस्काराने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments