Advertisement

बिरसा फायटर्सच्या बॅनरखाली आदिवासी व कुणबी समाज एकत्र

उद्या बिरसा फायटर्सचे प्रांत कार्यालय दापोली समोर ठिय्या आंदोलन 

प्रांताधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी,उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना निवेदन
दापोली: जामगे- विसापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणा-या बेंद्रेवाडी,कातकरवाडी,नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी जामगे- विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी संपादित केलेल्या धरणाच्या खालील बाजूस शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यास परवानगी मिळणे या मागणीसाठी दिनांक 17/02/2023 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय समोर बिरसा फायटर्सचे जामगे विसापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन होणार आहे.या आंदोलनाचे निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी आर.एम.दिघे ,उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक दापोली यांना देण्यात आले.या आंदोलनात जामगे व विसापूर गांवातील आदिवासी व कुणबी समाजातील लोक बिरसा फायटर्सच्या बॅनरखाली एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत.आमचे हे आंदोलन सामाजिक असून दोन समाजाला एकत्र येऊन पक्षांतील राजकीय लोकांना या आंदोलनातून चपराक बसणार आहे.अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिली आहे.
               उपविभागीय जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण उपविभाग दापोली यांचे दिनांक 22/11/2021 रोजीचे पत्रान्वये ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी पूर्वीपासून असणा-या स्मशानभूमीच्या जागेवर स्मशान शेड बांधण्यास मा.उपविभागीय जलसंधारण अधिकारी ,दापोली यांनी दिनांक 22/11/2021 रोजी सरपंच ,निर्मल ग्रामपंचायत विसापूर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांना दिलेल्या पत्रान्वये मनाई केली आहे.शासनाकडून स्मशानशेड बांधण्यासाठी साडेतीन लाख रूपये मंजूर झालेले असले तरी स्मशानशेड बांधण्यास मनाई असल्यामुळे सदर रक्कम परत जात आहे. स्मशानशेड नसल्यामुळे गावात होणा-या मृत व्यक्तींच्या प्रेताची अंत्यसंस्कार करण्यात हेळसांड होत आहे. पावसाळ्यात स्मशानशेड अभावी प्रेत जळत नाही,अंत्यविधी करण्यास अडचण येणे,लोकांना पावसात भिजत उभे राहावे लागते इत्यादी एकंदरीत अंत्यसंस्कार करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.तसेच सदर जागेवर प्रेत जाळण्यास मनाई केल्यामुळे आता प्रेत जाळायचे कुठे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या जागेजवळ बोअरवेल काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.
                 तहसीलदार दापोली व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिनांक 29/06/2022 रोजी जामगे-विसापूर ग्रामस्थ व बिरसा फायटर्स संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांच्या दिनांक 23/01/2023 पत्रानुसार स्मशानशेड बांधण्यास 3.50 लाख रूपये रक्कम मंजूर केल्याबाबतचे पत्र सरपंच/ग्रामसेवक विसापूर यांना देण्यात आले आहे.
                 तरीही जामगे -विसापूर येथील 4 वाड्यातील मयत व्यक्तींचे पूर्वीपासून प्रेत जाळून अंत्यसंस्कार करत असलेल्या जागेवर स्मशानशेड बांधण्यास ग्रामस्थांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी ,मृदा व जलसंधारण उपविभाग दापोली यांच्याकडून अद्यापही परवानगी दिली जात नाही.सदर ठिकाणी स्मशानशेड बांधण्यास अडचणी निर्माण केल्या जात आहेत. या गांवातील लोकांनी आत प्रेत कुठे जाळायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर स्मशान शेड बांधण्यास परवानगी देऊन प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.या स्मशानशेड बांधण्याच्या कामात राजकीय लोक अडथडे निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
               निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जामगे गावातील वाडी प्रमुख कृष्णा हिलम, बबन बेन्द्रे ,भिकाजी तांबट, निलेश जाधव,अविनाश खाडे,संतोष हिलम आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments