Advertisement

पत्रकारांचा सन्मान करणे ही काळाची गरज: सुशिलकुमार पावरा

दापोली: पत्रकारांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे,असे मत सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी व्यक्त केले आहे.पत्रकार हा भारतीय राज्यघटनेचा चौथा आधार स्तंभ आहे.वर्तमान पत्रात व न्यूज चॅनेल वर काम करताना म्हणजेच वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.म्हणून पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पत्रचारांमुळेच देशातील जडणघडण वास्तव्यात पाहण्यास वाचकांना मिळते.पत्रकार हे आपल्या सुंदर लेखणीतून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात, म्हणून त्यांचा सन्मान करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
                भारतीय राज्यघटनेत डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांना मानाचे स्थान दिले आहे.पत्रकारांना ग्रामीण व शहरी भागात काम करताना ब-याच समस्यांना तोंड द्यावे लागते.कधी कधी त्यांच्यावर राजकीय दबाव निर्माण केला जातो.तरीही पत्रकार हा तळागाळातील सत्यवादी लिखाण करून जनतेसमोर सत्य मांडत असतो.अशा पत्रकारांवर जे वारंवार हल्ले होतात ते थांबले पाहिजेत. अन्याय, अत्याचाराला आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात. सत्य घटना जनतेसमोर आणण्यासाठी पत्रकार हा नेहमीच प्रयत्न करतो.पत्रकार हा कुणाचा नोकर किंवा चाकर नसतो,त्यामुळे आपल्या धारदार लेखणीतून निर्भीड पणे सत्य उजेडात आणण्याचे काम करतो.म्हणून पत्रकारांचा सर्व समाजघटकांतून सन्मान होणे ही काळाची गरज बनली आहे,असे मत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments