Advertisement

मुरबाडचे भाजप आमदार किसन शंकर कथोरे यांचा बिरसा फायटर्स संघटनेकडून निषेध!

*आदिवासींच्या नोक-या बिगर आदिवासींना मिळाव्यात,आमदाराने केली आदिवासी समाजविरोधी मागणी!*

दापोली:आदिवासींच्या पदभरतीत इतर प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात यावी,अशी आदिवासींच्या घटनात्मक अधिकार व हक्काविरोधात मागणी करून समाजांत तेढ निर्माण करणा-या  किसन शंकर कथोरे भाजप आमदार मुरबाड जिल्हा ठाणे यांचा संघटनेतर्फे जाहीर निषेध नोंदवत असल्याबाबतचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे .
                             निवेदनात म्हटले आहे की,भाजपाचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी मा.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना दिनांक 06/02/2023 रोजीच्या पत्रान्वये 
अनुसूचित क्षेत्रातील 17 पदांच्या नोकर भरतीत अनुसूचित जाती ,इतर मागासवर्ग व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळणेबाबत अशी आदिवासी समाजविरोधी मागणी केली आहे.आदिवासी समाजाच्या घटनात्मक अधिकार व हक्क यांचे हनन करणारी व समाजांत तेढ निर्माण करणारी ही मागणी आहे. आमदार किसन कथोरे यांच्या या  आदिवासी विरोधी  कृत्याचे आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.
           आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक हक्क आहे.अनुसूचित जमातीला घटनेनुसार 7% आरक्षण देण्यात आले आहे व इतर समाजाला सुद्धा घटनात्मक आरक्षण देण्यात आलेले आहे.तरी सुद्धा आदिवासींच्या आरक्षणात इतर समाजाची किसन शंकर कथोरे सारखे लोकप्रतिनिधीं घुसखोरी करू पाहत आहेत. आदिवासी समाजाला ख-या अर्थाने 7% आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही,कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची,बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे.खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या लाखो नोक-या हडप केल्या आहेत. अशा एकूण 75 हजार बोगस कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण देण्याचा निर्णय दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी शासनाने घेतला.त्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी समूहाकडून राज्यभर तीव्र विरोध होत आहे. काल दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी बोगस आदिवासींविरोधात नंदुरबार येथे बिरसा फायटर्स व सहयोगी आदिवासी संघटनांकडून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.गैर आदिवासींनी अनेक श्रेत्रात आदिवासींच्या आरक्षणाचा गैर फायदा घेतलेला आहे व घेत आहेत. त्यामुळे आदिवासींच्या प्रगतीस अडथडा निर्माण होत आहे.आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासींनाच मिळाले पाहिजे.आदिवासींच्या आरक्षणातील नोक-या इतर समाजाला देण्यात येऊ नयेत. 
             आदिवासींची नोकरभरतीत अनुसूचित जाती,इतर मागासवर्ग व खुल्या प्रवर्गातून करण्यात यावी,अशी आदिवासी समाजविरोधी मागणी करणा-या मुरबाडचे आमदार  किसन शंकर कथोरे यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत.पुन्हा आमदार किसन शंकर कथोरे यांनी आदिवासी समाजविरोधी कोणतीही मागणी केल्याच किंवा आदिवासी समाज विरोधी भूमिका घेतल्यास आदिवासी विरोधी या आमदार किसन शंकर कथोरे व शासनाविरोधात सुद्धा बिरसा फायटर्स तर्फे  राज्यभर तीव्र आंदोलन छेडून निषेध व्यक्त करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा बिरसा फायटर्सने शासनाला इशारा देत निषेध नोंदवला आहे.भाजपाचे आमदार किसन कथोरे यांचा आदिवासी समूहाकडून राज्यभर तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

Post a Comment

0 Comments