Advertisement

बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती होईल श्री प्रदिप वाघ

 पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी 
आज कुर्लोद ग्रामपंचायत मधील महिला बचतगटा च्या महिलांना संबोधित करताना श्री प्रदीप वाघ उपसभापती यांनी सांगितले की आपल्या परीवाराची आर्थिक उन्नती साधायची असेल तर परांपर शेती व्यवसाया सोबत जोड धंदा सुरू केला पाहिजे, पशुपालन, फुलशेती भाजीपाला या सारख्या व्यवसायाला चालना दिली पाहिजे.
महिला हिच गृहलक्ष्मी असुन कुटुंब चालवत असताना आर्थिक अडचणी सांभाळत असते, म्हणून आपण उमेद योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे लाभ घेऊन बचतगट सक्षम करा व त्या अनुषंगाने आपली आर्थिक उन्नती करा असे आवाहन श्री प्रदीप वाघ यांनी महिलांना केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र यांचे नविन खाते उघडण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता.यासाठी बॅक ऑफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते उमेद योजनेचे तालुका अधिकारी श्री मोहंडकर व कर्मचारी यांनी नियोजन केले होते.कार्यक्रमास श्री प्रदीप वाघ उपसभापती, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच वाकडपाडा, श्री विठ्ठल गोडे पोलिस पाटील, श्री देवीदास गवारी, श्री राजेन्द्र पालवे रोजगार सेवक, श्री भारत बुधर, श्री मोहडंकर पंचायत समिती उमेद विभाग
व मोठ्या संख्येने बचतगटाचे सदस व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments