Advertisement

स्मरण मोखाडा तालुक्यातील पहिल्या आदिवासी शिक्षिका गंगूबाई ठोंबरे.

आदिवासी हक्क परीषद कडून स्मृतीना उजाळा

* पालघर प्रतिनिधी : सौरभ कामडी 
                स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या कांत्रीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती यानिमित्ताने देशभरात सरकारी स्तरावर किंवा खासगीही अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात मोखाडा तालुक्यातही आदिवासी संघर्ष हक्क परीषदचे अध्यक्ष प्रदिप वाघ यांच्याकडूनही कारेगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मोखाडा तालुक्यातील स्वातंत्र्यपुर्व काळात स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या पहिल्या आदिवासी शिक्षिका स्वर्गीय गंगुबाई राघोजी ठोमरे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येणार आहे.
    गंगुबाईचे वडील कोंडाजी भिकाजी पाटील हे तालुक्यातील धामणशेत येथील एक पुरोगामी विचाराचे त्या काळातील शिक्षक होते.त्यांनी वसई येथे शिक्षकाची नौकरी स्वीकारून न्यानदानाचे काम सुरू केले.याच वेळी त्यांच्या कुटुंबात गंगुबाई यांचा १७ नोव्हेंबर १९२१ रोजी जन्म झाला त्या लहानपणापासूनच हुशार होत्या त्यांचे ७ वी पर्यंतचे शिक्षण वसई येथे मुक्त व उदारमतवादी वातावरणात झाले.१९३६साली त्या ७ वी उतीर्ण झाल्या. शिक्षणानंतर त्यांचा विवाह राघो गंगाराम ठोंबरे मु.आडोशी (ता मोखाडा) या पेशाने शिक्षकच असलेल्या पुरोगामी प्रगतशील विचाराच्या या तरुणांबरोबर झाला.त्यांनी मोखाडा जव्हार याठीकाणी न्यानदानाचे काम केले.राघो यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बोर्डींग चालवण्याचे काम सुद्धा केले.त्याकाळी मुलींच्या शिक्षणाबाबत पालक उदासीन होते मुलीना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षकच हवेत असाही काहिंचा आग्रह असायचा यामुळे शिक्षित व हुशार धर्मपत्नी म्हणून सहचरणी असलेल्या गंगुबाईना राघो यांनी १९४० च्या सुमारास मोखाडातील पहिली शिक्षिका होण्याचा मान मिळवला.मुली शाळत येवू लागल्या व सहशिक्षण सुरु झाले.
         यानंतर गंगुबाई यांनी १९४४/४५ च्या सुमारास अध्यापिका विद्यालय नाशिक येथे अध्यापनशास्त्राचा दोन वर्षांचा कोर्स केला व त्यांनी पूर्णपणे प्रशिक्षित शिक्षिका म्हणून लौकीक मिळवला मोखाडा खोडाळा या ठीकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले अशाच सन १९७५ मध्ये त्यांचे निधन झाले.गंगूबाई यांचा मुला दिवगंत सुधारक ठोमरे हे वीज मंडळ जव्हार येथे कार्यरत होते गंगूबाई यांची सुन अर्चना ठोमरे या देख्वेल शिक्षिका होत्या त्यांच्या याच पावलावर पाउल ठेवून गंगुबाईच्या दोन्ही नाती शिक्षिका आहेत.सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्ताने गंगूबाईच्या नाती रुपाली ठोमरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे आपल्या पराआजीच्या आठवणी सांगतानाच रुपाली यांचे डोळे आपसूकच ओले होतात.दै पुढारीशी बोलताना त्यांनी तालुक्यातील पहिल्या आदिवासी शिक्षिका गंगुबाई यांची जीवनगाथा सांगितली याला आठवणीना आणि सावित्रीबाईना वंदन करण्यासाठी उपसभापती प्रदीप वाघ यांनी एका कार्यक्रमाचे आयोजनही केले होते यावेळी प्राथमिक स्वरूपात गंगुबाई यांच्या नातू आणि नातीचा सत्कार यावेळी करण्यात आला .......यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणजे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,रुपाली ठोंबर दै पुढारीचे पत्रकार हनिफ शेख जेष्ठ शिक्षक भरत गारे,खोडाळा सरपंच कविता पाटील,सुर्यमाळ सरपंच गिता गवारी,गोमघरच्या सरपंच सुलोचना गारे, सावर्डे सरपंच गौरी बोटे, करोळ सरपंच नरेंद्र येले, वाकडपाडा सरपंच लता वारे आदी सरपंच तसेच आदिवासी हक्क संघर्ष समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. 
      

गंगुबाईचा त्याकाळचा फोटो

Post a Comment

0 Comments