Advertisement

लोकप्रिय खा. डॉ.प्रितमताई मुंढे यांच्या हस्ते स्वामी गणेशानंद अर्बन बँकेचे उदघाटन करण्यात आले

 मानूर, तालुका.शिरूर कासार येथे श्री. स्वामी गणेशानंद अर्बन बँकेचे उद्घाटन बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर.प्रितम ताई मुंडे यांच्या हस्ते 21 जानेवारी 2023 सकाळी 11.00 वाजता करण्यात आले यावेळी माजी.आमदार सुरेश धस आण्णा, माजी.आमदार.भीमराव धोंडे, माजी.आमदार बाळासाहेब आजबे काका व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ नागरगोजे आबा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मानूर गावात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छा देत आदिनाथ नागरगोजे आबा यांचे कौतुक केले.राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या सर्व सुविधा या गणेशानंद अर्बन बँक खाते धारकांना उपलब्ध करून देणार. लॉकर सुविधा,कर्ज तारण सुविधा,सर्व ऑनलाईन ट्रांजेक्शन,बचत गट कर्ज, नेट बँकिंग,वीजबिल भरणा यासारख्या अनेक सुविधा बँक देणार आहे.मानूर व पंचक्रोशीतील सर्व युवा मिञ उद्योगजक गव्हरमेंट सर्व्हंट, शेतकरी कष्टकरी यांनी आदिनाथ नागरगोजे आबा यांना शुभेच्छा देत अतिशय सुंदर बाब मानूर परिसरात निर्माण केल्याबद्दल अभिनंदन केले. मानूर गावाचा परिसर मोठा असून बदलत्या काळानुसार इथ बँक गरजेची बाब होती आणि ती आदिनाथ आबा नागरगोजे यांनी निर्माण केल्याबद्दल दशरथ दादा वणवे यांनी ही शुभेच्छा दिल्या.मानूर हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे.कै.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज,श्री गणेशानंद महाराज,खंडोजी बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी असून श्री गणेशानंद महाराज यांचे जन्मस्थान आहे. श्री गणेशानंद महाराज यांचे कार्यक्षेत्र मानूर पिंपळनेर असून स्वामींनी इथेच अध्यात्मिक योगदान दिलेले आहे.त्यांच्या प्रती असणारी श्रद्धा,भक्ती याची जाण ठेवून त्यांच्याच नावाने ही बँक सुरू करून आदिनाथ नागरगोजे यांनी भक्ती भाव वृध्दींगत करण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे.संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे हे कार्य घडत असल्याने सामान्य माणसाने समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments