पालघर (सौरभ कामडी )
वाडा तालुक्यातील वरसाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रकाश शेलार यांच्या वतीने,दिनांक 12 जानेवारी रोजी गोरगरीब मायबाप जनतेसाठी 500 ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित लोकांनी प्रकाश शेलार यांचे जाहीर आभार मानले, त्यावेळी आभार मानत असताना तेथील गोरगरीब जनतेच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते. तेथील लोकं अशी बोलत होती कि, सध्या कडाक्याची थंडी पडली आहे.. आणि आमच्या हाताला कोणतेच कामं नाही रोजगार हमीची कामे सुद्धा बंद आहेत त्यामुळेआमच्याकडे ब्लॅंकेट घेण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत त्यामुळे थंडीमध्ये आमची मुले कुडकुडत होती अशा कठीण काळात तुम्ही आम्हाला आणि आमच्या मुलांना ब्लॅंकेट उपलब्ध करून दिले त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने तुमचे जाहीर आभार. ब्लॅंकेट वाटप करतेवेळी प्रकाश शेलार असे बोलले कि गोरगरीब जनतेची सेवा करणच माझं कर्तव्य मानतो, आपल्या भागातील सर्व परिवार हा माझाच परिवार समजतो म्हणून प्रत्येक परिवाराची काळजी घेणं हे माझं आद्य कर्तव्य मानतो.
तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवं चैतन्य मला अनावयाचे आहे, सर्व परिवार मला सुखी समृद्धी झालेले पाहायचे आहेत त्यासाठी माझ्या परीने मी गोरगरीब मायबाप जनतेची सेवा मी जिवंत असे पर्यंत करत राहीन असे प्रकाश शेलार बोलले त्यावेळी उपस्थित सर्वांनीच टाळ्या वाजवून प्रकाश शेलार यांच्या कार्याला दाद दिली. तसेच दिवाळी मध्ये सुद्धा मी एक हजार कुटुंबातील लोकांना मिठाई वाटून लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रयत्न केले असे सुद्धा प्रकाश शेलार बोलत होते.
0 Comments