Advertisement

गोंडी सगाना पुनेम मांदी वेळवा मेळावाचे उदघाटन सुरेशकुमार पंधरेचे हस्ते संपन्न

आरक्षण एसटी समाजात समान ता आनेल मांदीत सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्षाचे उत्तर 

एसके जी पंधरे-राज्य प्रतिनिधी रा.वि.पञकार संघ.भारत सरकार

पहांदीपारी कुपार लिंगो पुनेम महासंघ पंच शाखा वेळवा(येरवा) 
बा पवनी जि भंडाराचे विद्यमाने

पवनी-साकोली/तुमसर (८जाने) गोंडी सगाना पुनेम मांदी,गोंडी आदिवासी मेळावा वेळवा येथे संपन्न झाला.यावेळी गावातून नॄत्य मॄदुंगाने ,संगीतमय रेला नॄत्य करण्यात आले.मेळाव्याचे प़संगी उदघाटक सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष,अध्यक्ष-प्रभाताई पेंदाम प्रचारक,अशोक उईके,आ.प्रकल्प मा.अध्यक्ष भंडारा,देवराम टेकाम, विदर्भ पाटबंधारे विभाग,शंकर तेलमासरे,अध्यक्ष काँग्रेस,सुवर्णा रामटेके,पं सदस्या,ज्ञानेश्वर मडावी भंडारा, रूपचंद कन्नाके,,निलिमा कांबळे,गोंडी-संस्कार मांदी पिठावर हजर होते.यावेळी " सुरेशकुमार पंधरे"नी आपल्या भाषणात-' भाषा संस्कॄती वाचवून आरक्षणाने समानता, सामाजिक राजकीय,शैक्षणिक कार्य उच्चतम शिक्षणानेच पुर्ण कराल,आपण राजे आहात मत विकाल तर गुलाम होणार म्हणुन अज्ञानाची श्रॄखंला तोडायची तर डाँक्टर बाबासाहेबांच्या मंञाचे अनुकरण शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा हा ताना बाणा बाळगून लढा उभारा तरच पुढील समाजाचे भविष्य प्रकाशाकडे नेणारे असेल १७०० वर्षाचे गोंवाणाचे राज्य संपले.आपल्याकडे जर उद्योग निर्मान कराल तर गोंडराजे म्हणून गणल्या जाहाल नाहीतर गुलामी, हा कलंक पाचविला पुजलेलाच! व हा टिका पुसायचा तर गोंडी- भाषाचार्य मोतीराव कंगाले, वीर बिरसा मुंडा,बाबुराव शेडमाके, राघो भांगरे,राणी दुर्गावती,ख्वाजा नाईक शहिद तंट्या भिल्ल,सारखे फायटर्स यौध्दा बना तरच जूलमी पुढारी तुमच्यावर सत्ता गाजवणार नाहीत अविकशित पणाचे प्रमाण धार्मिकतेत आहे आपण निसर्ग- पूजक असून पुतळे बांधने बंद करा व देशाभिमानाकरिता महा- पुरूषांचे विचार,व पथावर चाला चांगले ज्ञान संत महात्मे,जेष्ठांच्या संगतीने अनुभव घ्या व जीवनात आत्मसात करून, सुखमय करा तसे अनुकरण कराल तर पूढची पिढी भिञी होणार नाही जेष्ठांचे विचार ईश्वराप्रती लखलाभ असतात. अन्यायी व्यवस्थेचा पर्दाफास करून न्यायालयीन लढ्यास पुढे येवून समाजाचे देने म्हणून संघटनेला लढा ऩिधी द्या व सोसल इंटरनेटवर,अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्याजतन करा,विकास शक्य आहे असे याप्रसंगी हिंदी मराठीत प्रतिपादन केले,मांदीत सहभाग घेतानी, सुवर्णा रामटेके, अशोक उईके, ज्ञानेश्वर मडावींनी,अनिष्ठ प्रथेवर टिका केली मांदी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर तेलमासरे तर संचालन व समारोप अभिमान कुंभरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments