Advertisement

पेसा ग्रमकोष समितीत स्थाई समित्यांचा अभाव अमलबजवणीत पंचायत समित्या उदासीन

 
पुणे:-पेसा कायद्याची अंमलबजावणी जिल्हा त प्रशिक्षण अभावी प्रभावी होतानी दिसत नाही.पेस ग्रामपंचायतीवर नेमणूक झालेल्या ग्रामसेवकांना नियमित पेस कायदा प्रशिक्षण दिले जात नाही.
 पेस ग्रामपंचायतीमध्ये "ग्रामपंचायत " आणि " ग्रामकोष समिती " ह्या वेगवेगळ्या स्वा यत संस्था असून त्यांची बँक खाते वेगळे आहेत .त्यांचा कारभार वेगळा असावा शासनाला अभिप्रेत आहे.ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्ष तर ग्रमकोश समितीचा कार्यकाळ दोन वर्षाचा आहे याबाबत ग्रामसेवक अनभिज्ञ असल्याचे समजते. ग्रामकोश समितीत आनेक स्ताई (कार्यकारी )समित्या गठीत करून सदस्यांची नेमणूक केली नसल्याची बाब बहुरंग चे अध्यक्ष ,पेस अभ्यासक डा कुंडलिक केदारी यांनी माहिती अधिकारातून उघड करून शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
  जुन्नर आंबेगाव तालुक्यातील पेस ग्रामपंचायतीतील ग्रांमकोष समितीत साधन संपती नियोजन व व्यवस्थापन , कर्ज नियंत्रण ,मादक द्रव्य नियंत्रण , शांतता न्याय समिती याव्यतिरिक्त समित्या नसल्याचे बाब डा कुंडलिक केदारी यांनी पत्रा ने जिल्हापरिषदेच्या निदर्शनास आणून दिली आणि यामधे पायाभूत सुविधा, जलसंधारण , वन्य जीव संवरधन , गाणं वनोपज , बाजार व्यवस्थपण, ग्वन खनिज , आणि सांस्कृतिक समिती गठित करून सदस्यांची नियुक्ती करण्याची वारंवार मागणी केल्यानंतर नुकतीच सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या.परंतु ग्रामपंचायत स्तरावर आजूनही कार्यवाही झाली नाही. पंचायत समिती याबाबत उदासीन आहे.
.…...........................
डॉ कुंडलिक केदारी पुणे

Post a Comment

0 Comments