Advertisement

आदिवासी समाज भवनासाठी आदिवासी समाज एकवटला

आमदार योगेश कदम यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन:सुशिलकुमार पावरा
दापोली:आदिवासी समाज भवन बांधण्यासाठीची शासकीय जमिनीची 7/12 आदिवासी समाजाच्या नावे करावी व आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी दापोलीचे आमदार योगेश कदम व दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना बिरसा फायटर्स व आदिवासी आदिम कातकरी संघटनेतर्फे करण्यात आली.
                आदिवासी समाज भवनासाठी दापोली तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज एकवटला आहे.निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,कार्याध्यक्ष संदिप पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम जाधव, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठोबा जगताप,सल्लागार कृष्णा हिलम, दामू पवार,रवी पवार, ननूषा हिलम,सुषमा हिलम,प्रिया जाधव,मालती जाधव,दगडू जाधव,आशाताई जाधव,अशोक पवार,नंदू वाघमारे,जयसिंग पवार, आदि असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
                     निवेदनात म्हटले आहे की, तलाठी कॅम्प दापोली यांनी दिनांक 19/01/2021 रोजी आदिवासी समाज भवन बांधकामासाठीची शासकीय जमिनीचा 7/12 उतारा दिला आहे.कॅम्प दापोली परिसरातील शेताचे स्थानिक नाव सातंब्याचा माळ येथील 0.15.18(6946)हे आर.चौ.मी.एवढी जमीन आदिवासी भवन बांधकामासाठी आदिवासी समाजाच्या नावे करण्यात यावी.समाजभवनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी व तहसीलदार दापोली यांना दिनांक 16/02/2021 रोजी दिलेला आहे.सोबत 7/12 उतारा व जमिनीचा नकाशा जोडला आहे.
                     गेल्या 5 वर्षापासून आदिवासी समाज भवनासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.दापोलीत 35 हजारहून अधिक आदिवासींची लोकसंख्या आहे.आमच्या समाजाच्या या मागणीकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे,नाहीतर आम्ही दापोलीत समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा आंदोलनाचा इशारा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments