Advertisement

शाळा व महाविद्यालयातील देवी देवतांचे फोटो काढा व महापुरूषांचे फोटो लावा: बिरसा फायटर्सची मागणी

देवी देवतांच्या फोटोची पूजा करायला सक्ती नको: सुशिलकुमार पावरा

गटशिक्षणाधिकारी दापोली यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

दापोली: शाळेत व महाविद्यालयात देवी देवतांचे फोटो त्वरित काढा व महापुरूषांचे फोटो लावावेत,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती दापोली यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन दापोलीचे गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले.
                      निवेदनात म्हटले आहे की, शाळा हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर आहे.शाळेत व महाविद्यालात अनेक जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात.त्यात हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन,बौद्ध,शीख,पारशी इत्यादी विविध धर्मातील विद्यार्थी व शिक्षक यांचा समावेश असतो.परंतु शाळा व महाविद्यालयात धर्मासंबंधीत काल्पनिक देवी देवतांचे फोटो लावलेले दिसून येतात. तसेच शाळा व महाविद्यालयात या काल्पनिक देवी देवतांच्या फोटोची पूजा करायला विद्यार्थ्यांना भाग पाडले जाते.साहजिकच धर्माबाबतचे काल्पनिक चित्र बालमनावर बिंबवले जाते.त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो.
                  शाळा महाविद्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,स्वामी विवेकानंद, क्रांतीकारक बिरसा मुंडा,भगतसिंग, राजगुरू,सुकदेव,चंद्रशेखर आझाद, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज , महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू,लोकमान्य टिळक,ए.पी.जे. अब्दुल कलाम इत्यादी महापुरूषांचे फोटो लावावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या महापुरूषांच्या कार्याची प्रेरणा घेता येईल. तरी शाळा व महाविद्यालयात देवी देवतांचे फोटो त्वरित काढण्यात यावेत,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शिक्षण विभागाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments