Advertisement

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा

दुर्गम भागातील आदिवासी ग्राहकांना वीज मिळणार नाही

दापोली: खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरण कर्मचारी यांनी दिनांक 4 जानेवारी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे.हा संप दिनांक 4,5 व 6 जानेवारी असा सलग 3 दिवस करण्यात येणार आहे.या संपला बिरसा फायटर्स संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.महावितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
            निवेदनात म्हटले आहे की,दिनांक 4,5,व 6 जानेवारी 2023 रोजी महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आमच्या बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत. वीज वितरण खासगीकरण करू नये,या खासगीकरणाला आमचा सुद्धा विरोध आहे.अदानी वीज कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नका.4 जानेवारी रोजी राज्यातील 86 हजार वीज कामगार, अभियंते,अधिकारी व 42 हजार कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांनी 72 तासांचा संप पुकारला आहे.त्यामुळे राज्यातील वीज कोलमडून पडून जनतेची विजेची गैर सोय होण्याची शक्यता आहे.
         संपात वीज कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत.जनतेच्या मागणीचा वीज उद्योग टिकला पाहिजे.तो भांडवलदारांना विकता कामा नये.भांडवलदार हे नफा कमविण्यासाठी वीज वितरण क्षेत्रात येत आहेत. भांडवलदार आले तर अनुदानित वीज बंद होईल.आदिवासी दुर्गम भागातील ग्राहकांना वीज मिळणार नाही.भांडवलदार नफ्याचे क्षेत्र ताब्यात घेतील. तोट्यात असणारे क्षेत्र महावितरण कंपनीकडे ठेवतील.त्यामुळे महावितरणचा तोटा वाढतच जाईल. म्हणून सरकारने वीज वितरणाचा खासगीकरण करण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा,अन्यथा महावितरण कर्मचाऱ्यांसोबतच बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने सरकारला दिला आहे.

Post a Comment

0 Comments