Advertisement

इम्पॅक्ट इंडिया च्या वतीने रुग्णालयाच्या प्रसूती कक्षाला आवश्यक साहित्याचे लोकार्पण.

पालघर:-सौरभ कामडी 

(मोखाडा - वार्ताहर) मोखाडा तालुका डोंगराळ भागात विखुरलेला असल्याने येथील लोकांच्या हाताला शेतीच्या शिवारातील कामाशिवाय इतर कामं नसल्याने कुटुंबाचा रहाट गाडा चालविण्या इतपत येथील लोकांकडे पैसा सुध्दा शिल्लक राहत नाही त्यामुळे नाशिक, मुंबई सारख्या महागड्या उपचारा ऐवजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयांतील उपचारांवर च अवलंबून रहावे लागत आहे.
  विशेष म्हणजे मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला स्त्रीरोग तज्ञ डॉ.भरतकुमार महाले मिळाल्यापासून तर मोखाडा ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्णांची संख्या अधिक पटीने वाढतच आहे.त्यातच गरोदर पणातील महिलांना प्रसुतीसाठी आवश्यक साहित्याची कमतरता सुध्दा भासत होती त्यामुळे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इम्पॅक्ट इंडिया या सेवाभावी संस्थेच्या ट्रस्टी डॉ.रोहिणी चौघुले यांच्या हस्ते फिटल मॉनिटर, फिटल डॉप्लर, फॉगर मशिन, लेबर टेबल, प्रसुतीचा पंप आदी उपयुक्त साहित्याचं रुग्णांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले.यावेळी डॉ.महाले यांनी संस्थेच्या ट्रस्टी डॉ.रोहिणी चौघुले यांचे आभार मानत अशा प्रकारचे सहकार्य नेहमी करावे असे आवाहन सुध्दा केले.
   या कार्यक्रमा प्रसंगी मोखाडा ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक भरत कुमार महाले, तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर, मोर्हांडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर देसले, डॉ.भुपेश हंबर्डे, डॉ.महेश पाटील, डॉ.दत्तात्रय शिंदे, डॉ.देवघरे यासह सेवाभावी संस्था इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे डॉ.सौरभ गुरव, डॉ.प्रविण लोंढे, डॉ.सचिन महाले, व्येंकटेश मेकाले यासह दिपक फाऊंडेशनचे पवन जाधव तसेच फाऊंडेशनचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments