Advertisement

मोलगीत कायदेविषयक साक्षरता व जनजागृती कार्यक्रम


 मोलगी:- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व नीती आयोग भारत सरकार यांचे निर्देशानुसार दिशा योजने अंतर्गत कायदे विषयक साक्षरता जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होते.दरवर्षी अशा कायदे विषयक कार्यशाळेचे आयोजन या भागात करण्यात येते या वर्षी ही लोकांना कायदे विषयक ज्ञान लोकांना व्हावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
             विधी सेवा सेवा प्राधिकरणाच्या कार्यक्रमात मोलगी परिसरातील लोकं मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विविध कायद्याविषयी सामाजिक कार्यकर्ते ब्रिजलाल पाडवी यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका विधी सेवा प्राधिकरण अक्कलकुव्याचे पी.आर.ठाकरे हे होते.
तसेच मोलगी पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक धनराज निळे ही उपस्थित होते.ते म्हणाले की लोकांनी कायद्याचे पालन केले म्हणजे कोणतेही गुन्हे होणार नाही.व काही लोकं आपसातील खुन्नस काढण्यासाठी एक मेकांवर केस करतात पण शेवटी खोटं ते खोटंच असतं म्हणून लोकांनी आपसातले भेद विसरून कोर्टाची पायरी चढू नये असे आवाहन केले.
पी.आर.ठाकरे.यांनी लोकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की लोकांनी खावटी विषय दावे,व कायदेविषय मार्गदर्शन केले.मंडळ अधिकारी चंद्रात्रे,यांनीही लोकांना शासकीय योजनांची माहिती दिली.महिला दक्षता समितीचे अध्यक्षा वसुंधरा वसावे म्हणाल्या की स्त्रीयांनी कायद्याचा लाभ जरूर घ्यावा पण खोटे बोलून नाही तर कायदा नेहमी खऱ्यांच्या बाजूनेच असतो.
              या कार्यक्रमात मोलगीचे मंडळ अधिकारी जाधव,तलाठी दिपक राऊत,माजी पोलीस पाटील रतनसिंग वसावे,सामाजिक कार्यकर्ते आपसिंग वसावे, बाजीराव पाडवी ॲड.फुलसिंग वसावे,सरदारसिंग वसावे ॲड.मोहन वसावे,आदि उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.गजमल वसावे,तर आभार प्रदर्शन फुलसिंग वसावे,यांनी केले

Post a Comment

0 Comments