दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम विधानसभेचे आमदार या. संजयजी शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांच्या विरोधात हात पाय तोडण्याची धमकी दिल्याची तक्रार दिलेली होती.
परंतु आमचा वाद मिटलेला आहे. माझ्याकडून चुकून ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता माझी नगरसेवक सिद्धांत शिरसाट व त्यांचे वडील आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात पोलिसात कुठलीही तक्रार नाही.
माझ्यावर कुठलाही दबाव बर्डन नाही. मी माझ्या राजी मर्जीने त्यांच्याबद्दल दिलेली तक्रार वापस घेत आहे. आमदार साहेबांची बदनामी करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता.
परंतु विरोधकांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याने सर्व प्रकार घडलेला आहे. आमदार साहेबांचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो व मुलाची माफी मागतो. असे लेखी पत्र त्रिशरण गायकवाड यांनी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला दिलेले आहे.
0 Comments