Advertisement

प्रा. वा. ना. दांडेकर बालकमंदिर विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

 दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, प्रा. वा. ना. दांडेकर बालकमंदिराच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल शुक्रवार दिनांक ०६/०१/२०२३ रोजी दाभोळ - कोळथरे - बुरोंडी येथे नेण्यात आली.
     दाभोळ येथे श्रीदेवी चंडिकेचे दर्शन झाल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रुती आंबर्डेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थ्यांना दाभोळ बंदर दाखविण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी कोळथरे येथील श्री. देव कोळेश्वराचे दर्शन घेतले व त्यानंतर त्यांनी समुद्राच्या पाण्यात खेळण्याचा आनंद लुटला. तेथे वाळूत त्यांनी डोंगर, किल्ले, गुहा, विहिरी तयार केल्या. वाळूत चित्र देखील रेखाटली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भगवान श्री परशुरमाचे दर्शन घेतले व परतीच्या प्रवासात गप्पा - गाणी म्हणत धमाल केली.
     या शैक्षणिक सहलीचे संपूर्ण नियोजन सौ. रजनी टोपरे यांनी केले. तसेच मुलांना ऐतिहासिक ठिकाणांची माहिती सौ. रजनी टोपरे व सौ. सोनिया जोशी यांनी सांगितली. सहलीचा संपूर्ण खर्च दापोली एज्युकेशन सोसायटीच्या शालेय समितीद्वारे करण्यात आला.

Post a Comment

0 Comments