Advertisement

मोखाडा महाविद्यालयात 'प्रसारमाध्यमांमधील करिअरच्या संधी' या विषयावर व्याख्यान


पालघर प्रतिनिधी-सौरभ कामडी 

           कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे मराठी वाङ्ममय मंडळ आयोजित,
  ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त 'प्रसारमाध्यमांमधील करिअरच्या संधी' या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज कामडी हे होते. यांनी प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांना 'आयडॉल आदिवासींचे' लेखक नारायण शेंडे यांनी लिहलेले पुस्तक महाविद्यालयाला भेट दिले. नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांचे विविध प्रकार त्यामध्ये भित्तीपत्रके, वर्तमानपत्र,साप्ताहिक, दिवाळी अंक, पुस्तक प्रकाशन, चारोळी , दूरदर्शन, आकाशवाणी,मालिका, सोशल मीडिया, युट्युब चॅनल,न्यूज पोर्टल, मनोरंजन इत्यादी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांविषयी माहिती देवून पत्रकार होण्यासाठी असलेली पात्रता काय असावी लागते व त्यासाठी असलेल्या अभ्यासक्रम,उपलब्ध कॉलेज याविषयी माहिती दिली.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर विविध रोजगाराच्या संधी त्यामध्ये विविध दैनिक वृत्तपेपर मध्ये जिल्हा, तालूका,गाव प्रतिनिधी, पत्रकार, संपादक, उपसंपादक,शासकीय कार्यालयामध्ये असलेले जनसंपर्क अधिकारी, मुद्रितशोधक ,न्यूज अँकर, रिपोर्टर, कॅमेरामन, ब्लॉगर,जाहिरात प्रतिनिधी अशा अनेक विभागामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या जीवनात आलेल्या विविध संधीचा लाभ घेऊन त्याचा उपयोग आपण करून घ्यायला हवे असे अवाहन विद्यार्थ्यांना केले. त्याचप्रमाणे पत्रकार कसा असावा, पत्रकाराच्या अंगी कोणते गुण असावे, त्यांनी स्वतः चे अनुभव सांगून मार्गदर्शन केले. त्याच बरोबर त्यांनी आतापर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याची व पत्रकार क्षेत्रातील विविध बातम्यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील समस्या सोडवण्यासाठी केलेले लेखन व त्यातून त्या समाजाला मिळालेला न्याय याविषयी विविध उदाहरणे देऊन पत्रकार हा लोकशाहीचा चौथ्या आधारस्तंभव त्याची प्रमुख भूमिका काय आहे हे पटवून सांगितले. 
    सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मनोज कामडी यांनी केलेले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे, त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम केले पाहिजे तसेच महाविद्यालयाच्या वतीने आदिवासी पाड्यावर सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.  
      सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. आर. डी. घाटाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. वाय. एच. उलवेकर यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन प्रा. व्ही.जी. चोथे यांनी केले.कार्यक्रमासाठी महविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व विषयाचे प्रध्यापक, व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments