*चौथ्था दिवशीही आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम*
दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे चौथ्था दिवशी ही प्रशासकीय कार्यालयासमोर कृषी अभियंत्यांचे खालील मागण्या साठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच आहे.
1.कृषि अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषि सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबावे आणि या दोन्ही परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी .
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा.
अशा मागण्यांसाठी हजारो कृषी अभियंत्रीकी विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ दापोली समोर ठिय्या मांडला आहे.कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रीया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
0 Comments