Advertisement

उडान महोत्सवात दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या पथनाट्याला प्रथम पारितोषिक

 दापोली:दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या पथनाट्याला देवरूख येथील आठले सप्रे पित्रे महाविद्यालयात झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक 'उडान' महोत्सवामध्ये प्रथम क्रमांकाचे झळझळीत यश प्राप्त झाले.
  प्रतिवर्षी मुंबई विद्यापीठाच्या 'आजीवन अध्ययन विस्तार विभाग' (DLLE) तर्फे 'उडान' महोत्सव आयोजित केला जातो. गेली आठ वर्षे सलग पथनाट्य प्रकारात दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालय अग्रेसर राहिले आहे. या वर्षी देखील 'विंचू चावला' या भारुड रुपी पथनाट्याला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. या प्रकारात एकूण अठरा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स महाविद्यालयाच्या पथनाट्याने अव्वल स्थान पटकावले.
  या पथनाट्यामध्ये सई सावंत, नियती भळगट, सायुरी कळसकर, रितीक्षा मिसाळ, कृतिका चव्हाण, मुस्कान पटेल, काजल टेमकर, क्रांती कालपाटील, रसिका बर्वे, मुबश्शीरा मणियार, नेहा मुल्ला, शुभम लोवरे, सुजल जैन, आयुश गुरव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. श्री. जयवंत काटकर यांनी लेखन व दिग्दर्शन केले. कु. हर्षल हांडे याने सहाय्यक म्हणून काम केले. विद्यार्थ्यांना डी. एल. एल. इ च्या प्रमुख प्रा. डॉ. गंगा गोरे, तसेच प्रा. विश्वेश जोशी, प्रा. अनिकेत नांदिस्कर, प्रा. निशिगंधा बंदरकर, प्रा. श्राव्या पवार, प्रा. श्रद्धा खूपटे यांचेही मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments