दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी रात्रौ मौजा गिलगांव (बाजार) ता. गडचिरोली येथे जय हनुमान नाट्य कला मंडळ गिलगांव आयोजित "अग्नीकुंड" या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी जनप्रतिनिधी जर लोकपयोगी कामं करत असतील व जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्यांना ज्यांना संधी मिळेल त्यांनी ती केली पाहिजेत. ईडी सरकारने (महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार) धनाला बोनस जाहीर केला त्याचे स्वागत आहे परंतु महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने प्रति हेक्टरी बोनस न देता महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या प्रतिक्विंटल 700 रुपयांपेक्षा जास्त बोनस द्यावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी आमदार तथा आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी, शिवसेना सह संपर्कप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार, माझी पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, माजी पं. स. उपसभापती विलासजी दशमुखे, बीजेपी तालुका महामंत्री हेमंतजी बोरकुटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच व्यासपीठावर माजी पं. स. सदस्य रामरतनजी गोहणे, अनु.जा. काँग्रेस जिल्हाध्यक्ष रजनीकांतजी मोटघरे, सरपंच अशोकजी कुळमेथे, पोलीस पाटील दिवाकर कोटांगले व मान्यवर मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
0 Comments