Advertisement

दापोलीचा एकविरा संघ विजेता,तर रत्नागिरी स्पोर्ट्स ठरला उपविजेता


*आदिवासी कबड्डी स्पर्धेचा रंगला थरार;बिरसा फायटर्स व मोरया क्रिडा मंडळचे आयोजन*
दापोली:कबड्डीचे माहेरघर असणा-या कळकवणे गांवी भव्य दिव्य स्वरूपात आदिवासी कबड्डी स्पर्धा रंगली.या स्पर्धेत दापोलीच्या एकविरा संघाने विजेतेपद पटकावले ,तर रत्नागिरी स्पोर्ट्स संघाने उपविजेता पद पटकावले. पिंपळीचा मोरया संघाला तृतीय पारितोषिक तर रत्नागिरीचा तिडेचा संघ चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला.बिरसा फायटर्स चिपळूण व मोरया क्रिडा मंडळ तर्फे या स्पर्धा कळकवणे गावात घेण्यात आल्या.यातील प्रथम क्रमांकास रोख रक्कम दहा हजार रूपये व चषक, द्वितीय क्रमांकास सात हजार व चषक, तृतीय क्रमांकास पाच हजार व चषक, चतुर्थ क्रमांकास तीन हजार व चषक देऊन गौरव करण्यात आला.
          या आदिवासी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन बिरसा फायटर्सच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच सविता निकम यांच्या हस्ते करण्यात आले.सविता निकम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला,त्यानंतर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व चिपळूण तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी क्रांतीकारक नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर कबड्डी स्पर्धेच्या मैदानात श्रीफळ फोडून उद्घाटन सामना खेळवण्यात आला.सर्व खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेत एकूण आदिवासी पुरूष संघांनी सहभाग नोंदवला.पेण,रोहा,महाड,सातारा,जावळी,रत्नागिरी, दापोली,खेड,मंडणगड, चिपळूण अशा महाराष्ट्रातील विविध भागातून  संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
           या स्पर्धेत चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण,सरपंच सविता निकम, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,बिरसा फायटर्स सातारा जिल्हाध्यक्ष, बिरसा फायटर्स रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत निकम, चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष रवी जगताप, माजी जि.प.सदस्य काशिनाथ जगताप, काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण,भाजप तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, अँड. अमित कदम,डाॅ.भिसे,जगन्नाथ वाघे, महेश जाधव,चंद्रकांत शिंदे,विजय शिंदे,पुतळाजी शिंदे,दत्ताराम शिंदे,मनोहर सकपाळ आदि मान्यवरांनी भेट देत खेडाळूंना प्रोत्साहन दिले.

Post a Comment

0 Comments