Advertisement

विश्व मराठी संमेलनात जव्हारमधील आदिवासी नृत्य कलाकार पथकांचा उस्फुर्त सहभाग

पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी 

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आयोजित मराठी तितुका मेळवावा विश्व मराठी संमेलन २०२३ दिनांक ४ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ डोम, एन एस सी आय, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी मुंबई येथे जगभरातील मराठी बांधवांना एकत्र आणून त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले असून त्यामध्ये मराठी भाषा, संस्कृती आणि कलेचे संगम वाद्य संस्कृती या कार्यक्रमातून बघायला मिळाली,पहिल्याच विश्व मराठी संमेलनात एकूण ४८ देशातील ५०८ मराठी भाषिक प्रतिनिधींनी हजेरी लावली असून या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ५ जानेवारी रोजी दुपारी वाद्य महोत्सव महाताल (सांस्कृतिक संचालनायल) या कार्यक्रमामध्ये विविध लोकवाद्य वाजवणारे ५०ते ६०लोककलावंत हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आदिवासी वाद्य संस्कृती व नृत्य परंपराचे कला संस्कृतिचे विश्व मराठी संमेलनात सादर करून उपस्थित सर्व मान्यवरांचे व उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यामध्ये सुरवातीला पिंपळगाव नांगरमोडा येथील घांगळी वाद्य वाजून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्याच बरोबर या कार्यक्रमात वाळवंडा गावचे सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांनी त्याचे तारपा वाद्य वाजवून त्या तालावर तारपा नाच करून उपस्थित सर्व प्रेक्षकांची व मान्यवरांची मने जिंकली. ढोल नृत्य,, सांबळ व बोहाडा मध्ये विविध देवतांचे मुखवटे बांधून आपली कला सादर केली. त्याचबरोबर ,नंदीनृत्य, वाघ नृत्य,सादर केले. व वनवासी गावातील महिलांनी मोरघा नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांचे मन आकर्षक केली.त्यानंतर तुळजापूर येथील टिपरी नृत्य व डाक भक्ती, मादोंळ वाद्य ,थाळगाणे इत्यादी कला व वाद्य संस्कृतीचे सादरीकरण करून या विश्व मराठी संमेलनात अनेक देशातून आलेल्या मान्यवरांना आदिवासी वाद्य कला व नृत्य कला बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.यासाठी कलाकारांना घेऊन येण्यासाठी संयोजक म्हणून संदीप पाटील, हेमंत पाटील व जव्हार तालुक्यातील निवृत्त मुख्याध्यापक गोपाळ बोरसे, सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी,सीता गावंढा यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे सादरीकरण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व आदिवासी कलाकार,वादक ,महिला भगिनी यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments