Advertisement

पुष्प 7 वे जिल्हा परिषद मराठी शाळा शहाणेबर्डी व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.शाळा शहाणेबर्डी येथे संपन्न झाली.


दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शहादा तालुक्यातील जावदे त.ह. केंद्रांतर्गत शिक्षण परिषद पुष्प  7 वे जिल्हा परिषद मराठी शाळा शहाणेबर्डी व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शहाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.शाळा शहाणेबर्डी येथे संपन्न झाली.


सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. डी.टी.वळवी साहेब (गट शिक्षणाधिकारी , पंचायत समिती शहादा) व प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री. श्यामराव ईशी साहेब(शिक्षण विस्तार अधिकारी- प.स. धडगाव) यांची उपस्थिती लाभली. तसेच शिक्षण परिषदेला केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. डी.जी वायखर सर, केंद्र मुख्याध्यापक श्री.रजेसिंग खर्डे सर, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.एन.मोते सर, जि.प.मुख्याध्यापक श्री.शिवाजी पावरा ,ग्रामपंचायत शहाणाचे उपसरपंच श्री.नरेंद्र भंडारी,जि.प.शाळा शहाणेबर्डी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गोपालभाऊ भंडारी , उपाध्यक्षा सौ. अनिताबाई ठाकरे, सदस्य अनिल रावताळे तसेच गावातील  नागरिक व युवा मंडळी यांची उपस्थिती लाभली.

शिक्षण परिषदेनिमित्त जावदे त. ह. केंद्रातून पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी पदी नियुक्ती मिळाल्याने माननीय श्री.शामराव ईशी दादांचे जावदे त.ह.केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सपत्नीक निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता.त्या कार्यक्रमांतर्गत ईशी नानांना पुढील शुभेच्छा दिल्या व निरोप देताना त्यांना भेटवस्तू  देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आणि दादासाहेबांविषयी ज्येष्ठ शिक्षक श्री. दिनेश चव्हाण सर , विनोद गरुड सर , प्रवीण अहिरे सर , जगदीश बोरसे सर, श्रीमती शिरसाठ मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री.डी.टी.वळवी साहेब व केंद्राचे केंद्रप्रमुख वायखर सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

निरोप  समारंभा नंतर शिक्षण परिषदेचे पुष्प 7 वे ला सुरुवात झाली,त्यात शिक्षण परिषदेतील विषयावर चर्चा , गटकार्य  करून कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाला जि. प.शाळा शहाणेबर्डी चे सहशिक्षक हारसींग राजपूत सर तसेच आश्रम शाळेचे प्राथमिक विभागाचे सह शिक्षक बन्सीलाल भंडारी ,शिवराम पावरा ,हितेश चव्हाण ,मनुवेल वळवी, प्रदीप भंडारी ,श्रीमती मंगला पावरा, कल्पना जाधव ,रंजीता पावरा यांच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Post a Comment

0 Comments