Advertisement

मी गुलाब सोनवणे आदिवासी एकता परिषद तालुका सचिव शिंदखेडा माझ्यावर काही दिवसांपूर्वी खोट्या प्रकाराची बदनामी केली आहे म्हणून मी आज पत्रकार परिषदेत जाहीर खुलासा

शिंदखेडा:- गेल्या दोन तिन दिवसा पासुन आदिवसी एकता परिषद तालुका सचिव गुलाब सोनवणे म्हणून पदावर आहे, वरीष्ठ अधिकारी यांचा सहकार्याने तालुका सचिव गुलाब सोनवणे गेल्या पाच वर्षापासून तालुक्यात अनेक सामाजिक कार्य करीत आहे. पुर्वी बंगला भिलाटी येथिल रहिवासी असून सध्या विर एकलव्य नगरात विविध विकास कामे करत असतांना माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत सन २०२३ मध्ये होणारा आदिवासी संस्कृत एकता महा संमेलन ३० वे आदिवासी संस्कृत संमेलन होणार आहे.तरी त्यासाठी संस्थापक अध्यक्ष वाहरूदादा सोनवणे यांच्या अध्यक्षेतखाली नियोजन बैठक कवाट जिल्हा छोटा उदयपुर गुजरात येथे संपन्न झाले, त्यात शिंदखेडा तालुक्यासाठी १० पावती पुस्तक व जळगाव जिल्ह्यासाठी सुनिल गायकवाड यांना २० पावती पुस्तक देण्यात आली आहे.२० पावती पुस्तक संस्थपक अध्यक्ष वाहरूदादा सोनवणे यांनी असे ५० पावती व पुस्तक राष्ट्रीय आदिवासी एकता संमेलनासाठी आर्थिक निवेदन समिती अध्यक्ष आप शनिया भाई राठवा (मो. ९४२००५४१८) यांनी पाठविले आहेत. रीतसर तालुक्यात आदिवासी समाजाकडुन महा संमेलनासाठी आर्थिक मदत म्हणून स्वखुशीने वर्गणी गोळा करण्याचे काम सुरु आहे. 
तरी काही समाजकंठकाची माझ्या बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.की मी खोटे पावती तयार करुन लोकांन कडून लुटमार करतो आहे असे आरोप माझ्यावर केला होता, त्यामुळे माझ्या मानसिक स्थिती खराब झाली आहे. मी कोणत्याही प्रकारच्या खोट्या पावती पुस्तक छापून गैरव्यवहार केलेला नाही आहे आणि करणार भी नाही. मुदामहून जाणिवपुर्वक माझ्यावर गेल्या तिन दिवसापासून खोटे आरोप लावला आहे. मी गेल्या पाच वर्षापासून समाजासाठी आरध्यारात्री पर्यंत सामाजिक विविध कामे करीत आहे, त्यात कोणत्याही मंचाने माझ्यावर खोट्या बदनामी करु नये,कारण आदिवासी एकता परिषद ही एक चळवळ आहे संघटना आहे, असे सामाजिक संघटना मध्ये मी अतेश्य पुर्ण निष्टाने सामाजिक कार्य केल आहे आणि पुढे ही असे नेक कार्य समाजासाठी करत राहणार माझ्यावर किती ही खोटे आरोप लावा पण मी आदिवासी एकता परिषद चळवळ संघटनाचे काम थांबवणार नाही आणि ह्या पुढे माझे पदधिकारी सोबत होऊन गेल्या ३० वर्षाची चळवळीच्या माध्यमातुन आमचे कार्य सुरु राहील. कुणीही हस्तक्षेप करुन नये अशी मी विनंती करतो
आपलाच तालुका सचिव गुलाब सोनवणे आदिवासी एकता परिषद शिंदखेडा

Post a Comment

0 Comments