पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी
न दैन्यम न पलयानम ब्रिदवाक्य घेऊन घेऊन पत्रकारांचे न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यता प्राप्त पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व उपाध्यक्ष राम खुर्दळ यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज कामडी यांच्या उपस्थितीत जव्हार येथे पालघर जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभा संपन्न झाली. या कार्यकारणीमध्ये पालघर जिल्हा शाखा कार्यकारणी ची निवड करण्यात आली. सामान्य पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकार संरक्षण समितीच्या पालघर जिल्हा संघटक पदी जव्हार तालुक्यातील उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ता व युवा पत्रकार प्रदीप कामडी यांची निवड करण्यात आली. ते आपल्या निर्भीड लेखणीतून नेहमीच सामान्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे असतात. ते स्वतः विधी शिक्षणा बरोबरच पत्रकारिता पदवी करत असून त्यांच्या कडून मजबूत संघटन होईल यासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे.
नागरिकांच्या व पत्रकार बांधवांना येणाऱ्या आडी - अडचणी व समस्या त्यांच्या न्याय हक्कासाठी ही समिती लढत असून जिल्ह्याच्या व तालुक्याच्या नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदी सोमनाथ टोकरे, सचिव पदी हेमंत घाटाळ व जव्हार तालुका अध्यक्ष पदी प्रमोद मौळे, उपाध्यक्ष पदी सुनिल जाबर व विक्रमगड तालुका अध्यक्ष पदी दीपक भोये, सचिव पदी प्रशांत दाहवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकार बांधव यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्या विषयी चर्चा केली. तसेच यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी यांनी उपस्थित सर्वांना पत्रकार संरक्षण समिती उद्देश व कार्यपद्धती,नविन सदस्य नोंदणी विषयी मार्गदर्शन केले.
0 Comments