Advertisement

पोलिस भरती साठी सज्ज व्हा आदिवासी तरुणांना मा. सभापती प्रदीप वाघ यांचं आव्हान

* पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी 


आज आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने कारेगाव आश्रम शाळा मैदानावर पोलिस व वनविभाग भरती साठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते यावेळी श्री प्रदीप वाघ अध्यक्ष आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती यांनी सांगितले की सर्व उमेदवारांनी प्रचंड मेहनत घेऊन आपण या भरतीला सामोरे जा,मैदानी बरोबर लेखी परीक्षेचा देखील सराव करा, कमी दिवसांत जास्त मेहनत घेतली तर आपण नक्कीच पोलिस दलात भरती व्हायला पात्र ठराल, आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती आपल्या सोबत आहे.असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री संजय कुमार ब्राम्हणे पोलिस निरीक्षक मोखाडा यांनी मुलांना मार्गदर्शन करताना महत्वाच्या सुचना देखील दिल्या.
गणित विषयासाठी मार्गदर्शक म्हणून श्री योगेश दाते यांनी सांगितले की गणित किंवा इतर लेखी परीक्षा विषयी कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधावा.
नेट सेट परीक्षा उत्तीर्ण लक्षण ठोमर यांनी सांगितले की मी देखील आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालो आपण अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.
पळसुंडे येथील पोलिस प्रशिक्षण संस्थेच प्रशिक्षक माजी सैनिक श्री तुमडे सर यांनी शारीरिक पात्रता व मैदानी गुण कशे मिळतील या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी गोळा फेक सरावासाठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
यावेळी श्री देवराम कडु सरपंच, श्री नरेंद्र येले सरपंच, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री परशुराम अगिवले उपसरपंच, श्री घनश्याम फसाळे, उपसरपंच, श्री निलेश झुगरे, श्री मुरलीधर कडु ग्रामसेवक श्री धुरंधर, श्री एंरडे, श्री दोंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष श्री मंगेश दाते, उपाध्यक्ष श्री रमेश बोटे, सचिव श्री संजय वाघ, विष्णू हमरे, संजय हमरे, गणेश खादे, निलेश ठोमरे, नरेंद्र वाघ, श्री प्रकाश मडके, राजाराम येले श्री निलेश कडु, अशोक वाघ, विठ्ठल गोडे,अंनता वारे, गणेश वाघ पत्रकार, श्री अंकुश वाघ यांनी केले.
यावेळी कारेगाव आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी देखील मार्गदर्शन केले व सहकार्य केले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments