Advertisement

पडघा येथे आईच्या स्मृतिदिनी जपली सामाजिक बांधिलकी


-- पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी 
     भिवंडी तालुक्यातील पडघा समता नगर बोरीवली येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका स्मृतीशेष ललिता लक्ष्मण दोंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आगळा वेगळा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम दोंदे कुटुंबीयांकडून साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली
        ललिता फाउंडेशन च्या वतीने सर्वप्रथम रविवारी 11 डिसेंबर 2022 रोजी पडघा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन बोरिवली गावचे प्रभारी सरपंच फरहान सुसे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पडघा डॉ.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कोकीवले डॉ.अशोक धवस डॉ. अशोक भांगरे निवृत्त पीएसआय उमाकांत दोंदे सामाजिक कार्यकर्ते जीवन दोंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
         यावेळी दोन्ही परिवारातील डॉक्टर्स डॉ.सिद्धार्थ संजय दोंदे डॉ.सृष्टी किशोर गायकवाड डॉ. आस्था शैलेश दोंदे यांनी रुग्णाची मोफत तपासणी करत औषधोपचार करत आदरांजली वाहिली
    स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला दोंदे परिवारातर्फे स्मृतीशेष ललिता आई यांना आदरांजली वाहण्यात आली
   दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी स्मृतिदिनानिमित्त तीन सत्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या सत्रात भंतेजी मत्तो धम्मो बदलापूर यांच्या शुभहस्ते धम्मविधी मंगलमय वातावरणात पार पाडण्यात आला यावेळी भंतेजीनी धम्मदेसना दिली तर नंतर दोंदे परिवाराकडून भन्तेजींना चिवरदान व त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशन करिता 15 हजार रुपये अंजना संजय गायकवाड या आईच्या मुलीने धम्मदान केले
  नंतर सुनंदा पवार यांच्या करोना काळातील विशेष कामगिरीसाठी ज्यांनी कोरोना काळात काही आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या घरी ठेवून अनाथ आश्रम चालविले या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना 10 हजार रुपयांचे धम्मदान संध्या किशोर गायकवाड या आईच्या मोठ्या मुलीने केले तसेच शहापूर येथील धम्मदीप बुद्धिस्ट स्कल्चर केंद्राच्या भव्यदिव्य इमारतीच्या बांधकामासाठी 50 हजार रुपयाचे धम्मदान तसेच ग्रामीण आदिवासी भागातील सरळगाव विभाग हायस्कूल तालुका मुरबाड येथील विद्यालयास साऊंड, माईक,म्युजिक सिस्टिम या वस्तूचे धम्मदान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्यापनासाठी दोंदे कुटुंबियांतर्फे करण्यात आले
    दुसऱ्या सत्रात ललिता आईंच्या जीवनावर आधारित माणुसकी फुलवणारी आई या त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले तदनंतर साहित्यिकांनी आपल्या मनोगतातून आंबेडकरी चळवळ व ललिता आईचे योगदान यावर प्रकाश टाकला.
 यात आंबेडकरी विचारवंत सुरेश सावंत साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड प्राध्यापक शरद ताजणे ओतूर,कवि प्रा. संजय इधे यांनीही आपले विचार मांडले
    तिसऱ्या सत्रात आंबेडकरी आई या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत लेखिका प्राध्यापिका आशालता कांबळे मॅडम यांचे आंबेडकरी आई या विषयावरील महाराष्ट्रातील पहिल्या व्याख्यानाची सुरुवात या ठिकाणाहून केली त्यांनी आंबेडकरी आई ही समाजापुरतीच मर्यादित नसून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी झीजत असल्याचे उदोहारणासह स्पष्ट केले
   कार्यक्रमाचा शेवट शैलेश लक्ष्मण दोंदे यांनी उपस्थितांचे आभार मानत केले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कवियत्री सुरेखा पैठणे मॅडम यांनी सुरेख रित्या केले.
   सदर कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात होत असून आगळावेगळा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा कार्यक्रमाची सद्यस्थितीत समाजाला गरज असल्याची विचारवंत साहित्यिक लेखक कवी यांनी सांगितले त्यामुळे शैलेश दोंदे व परिवारांचे आंबेडकरी समाज पुरोगामी तसेच आदिवासी बहुजन समाजाकडून त्यांना कौतुकाचे फोन येत असल्याचे दोंदे परिवाराकडून समजले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय लक्ष्मण दोंदे,प्रा. किशोर गायकवाड (कल्याण ), संजय गायकवाड ठाणे कल्पेश उमाकांत दोंदे, सचिन रा दोंदे, अनिकेत प्र दोंदे, गितेश शि जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments