Advertisement

रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधामचे मैदानी स्पर्धेत यश


७ खेळाडूंची जिल्हास्तर स्पधेसाठी निवड

शिरूर : शिरूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधामच्या खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत यश संपादन केले असून ७ खेळाडूंची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
 शिरूर येथील सी . टी .बोरा कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा संपन्न झाल्या . त्यात मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती विद्यालयाच्या एकूण २२ मुली आणि १७ मुलांनी सहभाग घेतला होता .
 या सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत प्रशालेचे नाव तालुक्यात झळकवले . यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे :
*१४ वर्ष वयोगट मुले* : -
ओमकार भालेराव - १०० मी. धावणे - प्रथम ,थाळी फेक - तृतीय ,
सिद्धांत टाव्हरे - गोळा फेक - तृतीय .
*१४ वर्ष वयोगट मुली* :
सानिका कोल्हे २०० मी धावणे -प्रथम ,थाळी फेक -तृतीय ,तनिषा तायडे -६०० मी धावणे -द्वितीय , देवकी पवार -गोळा फेक - तृतीय
*१७ वर्ष वयोगट मुली* :
 पायल हांगे ३००० मी धावणे - प्रथम ,३००० मी चालणे -द्वितीय ,१५०० मी धावणे - द्वितीय , संस्कृती चव्हाण ३००० मी धावणे - द्वितीय ,
किर्ती वगरे ३००० मी चालणे - तृतीय .
  राऊत प्रशांत कुस्ती प्रथम
 या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक सुभाष पाचकर ,संजया नितनवरे ,जयश्री बगाटे , दिपाली घावटे ,चांदबी मुलाणी ,सुनिल क्षीरसागर, अमोल गंगावणे भागवत भुसारे, सुधीर गायकवाड विकास भोसले; अभिजित खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले .विद्यार्थ्याची प्रवासाची सोय मानसिंग भैया पाचुंदकर तसेच स्वातीताई पाचुंदकर यांनी केली
या भरीव यशाबद्दल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिलजी बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समिती अध्यक्ष कांतीलालजी बोथरा,                  
मुख्याध्यापक काशिनाथ वेताळ , पर्यवेक्षक सुभाष पाचकर ,जि.प.सदस्या स्वातीताई पाचुंदकर, पं. स. सदस्य विक्रम पाचुंदकर कृ. उ. बा. समिती मा उपसभापती व शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर सरपंच सर्जेराव खेडकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments