Advertisement

शिंदखेडा येथे आदिवासी एकता परिषदेच्या वतीने वीर एकलव्य व क्रांतिवीर बिरसा मुंडा नगराचे फलक नामकरण सोहळा संपन्न

 शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी -- येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आज क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 147 वी जयंती साजरी करण्यात आली. ह्यावेळी बंगला भिलाटी ऐवजी वीर एकलव्य नगर तर साबरहट्टी ऐवजी क्रांतिवीर बिरसा मुंडा नगराचे फलक नामकरण नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांच्या हस्ते तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे व रविंद्र केदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
 ह्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गोरावडे, उद्घाटक नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र केदार, मंडळाधिकारी आर.एच.कोळी, भावियुमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले, पो.हे.का. भामरे, नगरसेवक अर्जुन सोनवणे, माजी नगराध्यक्ष नामदेव भिल, जेष्ठ आदिवासी नेते सुरेश सोनवणे, नाना कुंवर उपस्थित होते. सुरुवातीला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.गेल्या वर्ष भरापासुन आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकारी यांनी नगरपंचायत ला पाठपुरावा करून सदर शहरातील बंगला भिलाटी ऐवजी वीर एकलव्य नगर तर साबरहट्टी ऐवजी क्रांतिवीर बिरसा मुंडा नगराचे फलक नामकरण सोहळा उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रास्ताविक सुरेश सोनवणे यांनी केले त्यातून आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकारी यांनी आदिवासी वस्तीतील पुर्वीपासून बंगला भिलाटी व साबरहट्टी भिलाटी अशा नावाने ओळखले जात होते. त्यास पाठपुराव्यामुळे नगरपंचायत नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे व गटनेते अनिल वानखेडे तर मुख्याधिकारी प्रशांत बिडगर व प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मान्यता देऊन वरील नवीन नगराचे नावावर शिक्कामोर्तब केले व आज फलक नामकरण सोहळा उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाला याचा मनस्वी आनंद आदिवासी समाजाला झाल्याने नगरपंचायत पदाधिकारी यांचे आभार आदिवासी एकता परिषदेच्या वतीने मानले. 
ह्या पुढे सर्व कागदोपत्री नोंद वरील नवीन नावांची वस्तीतील नागरिकांनी करावी असे आवाहन त्यांनी केले. ह्यावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भुपेंद देवरे, कार्याध्यक्ष दिपक फुले, सल्लागार शाम भाऊ सोनवणे, आप्पा सोनवणे, सदस्य कैलास मोरे, जिभाऊ फुले, युवराज पवार शाखाप्रमुख जोगशेलु, सुकदेव भवरे शाखाप्रमुख नेवाडे, योगेश सोनवणे शाखाप्रमुख वरुळ, भिमा मोरे शाखाप्रमुख कुमरेज, मनोज मोरे, सुकदेव सोनवणे, हिरचंद महाराज,अशोक महाराज,महारु महाराज, नामदेव महाले,राजु पवार, दयाराम सोनवणे, गोकुळ सोनवणे, नामदेव सोनवणे यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते. आभार तालुका सचिव गुलाब सोनवणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments