● प्राचार्यांकडे एक्कावन्न हजार केले सुपूर्द
पालघर प्रतिनिधी | सौरभ कामडी
खोडाळा : पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा मोखाडा नगरपंचायत नगराध्यक्ष, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी या महाविद्यालयास एक्कावन्न हजाराची देणगी मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांच्याकरवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
मोखाडा तालुक्यात दोन वरिष्ठ महाविद्यालये आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञान प्रवाहात आणून ज्ञानदान देण्याचे काम करत आहेत. त्यातील मोहिते महाविद्यालय खोडाळा परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या महाविद्यालयात तालुक्यातील, खोडाळा परिसरातील बहुतांश विद्यार्थी आदिवासी व गरीब आहेत. तसेच महाविद्यालय देखील विना अनुदानित तत्वावर कार्यरत असल्याने सामाजिक बांधिलकी ठेवून शैक्षणिक कार्यास हातभार लागावा या उद्देशाने मागील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अमोल पाटील यांनी महाविद्यालयास देणगी जाहीर केली होती. आज मोखाडा पंचायत समिती उपसभापती यांच्याद्वारे प्राचार्यांकडे रक्कम सुपूर्द केली.
यावेळी मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ, गिरीवासी सेवा मंडळाचे खजिनदार भास्कर खोळंबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, प्रा. मेघा सोनटक्के, वाकडपाडा सरपंच नंदकुमार वाघ, माजी सरपंच संजय वाघ, प्रा. गंगाराम घाटाळ, प्रा. नवीन उसावला, प्रा. माधुरी अहिरे, प्रा. मयुरी नागवंशी, प्रा. दिलीप भोये, प्रा. दीपक पागी, सिद्धार्थ मोहिते आदी उपस्थित होते.
0 Comments