Advertisement

पुणे येथे १४ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात भव्य रैलीचे मोर्चा काढण्यात आले


नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाची तिसरी आवृत्ती अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले
       आज रोजी १० डिसेंबर २०२२ शनिवारी सकाळी १० वाजता पुणे येथे 14 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या संमेलनात नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाची तिसरी आवृत्त संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते,प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले आहे.
 संमेलनात विविध राज्यांतून मोठ्या संख्येने रसिक , कवी, विचारवंत कार्यकर्ते, मार्गदर्शक पहिल्या दिवशी उपस्थित होते.
        या वेळी सर्व दूर परिचित आहे पुणे सारख्या शहरात गेर नेत्याचा लोकांना गेर नृत्याचा आस्वाद घेता आले.संमेलनात लोकशाही व्यवस्था, संविधान, साहित्य, मानवता, निसर्ग, कला अश्या विविध विषयांवर चर्चा परिसंवाद चर्चा करण्यात आले.
          महात्मा फुले वाडा येथून मोठ्या दिमाखात,विविध देखाव्यात विद्रोहाचा घोषणा देत, विविध नृत्य पथकांसह मिरवणूक राष्ट्र सेवा दल परिसरात कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी आले. 
          
सातपुड्यातील लक्कडकोट येथील गेर नृत्य संमेलनात सहभागी होते.गेर नृत्य हा आदिवासींच्या होळी सणातील आदिवासी नृत्य आहे,या मध्ये आदिवासी संस्कृतीचे ढोल, मांदल,थाळी,पावी,तुतडी अशी आदिवासींचे पारंपारिक वाद्य असतात.
 पुरुष विविध वेश परिधान करून नृत्यात सहभागी होतात. त्यात तलवार घेऊन पुरुष नाचतात त्यांना गेर म्हटले जाते,तर पुरुष महिलेच्या वेशात नाचतात त्यांना,राय म्हटले जाते. काली, निसक्या, जिम्र्या अशी विविध भूमिकेत हे गेर नृत्य सातपुड्यातील आदिवासिंचे महत्वाचे नृत्य आहे.आज मोठ्या प्रमाणावर हे गेर नृत्य गावागावांतून नामशेष होत आहे याचे दुःख वाटते.
असे संतोष पावरा युवा कवी साहित्यिक नंदुरबार यांनी साहित्य संमेलनात सांगितले
महात्मा फुलेंचे 'घालमोडया दादांना पत्र' आणि विद्रोहीची १४ संमेलने. विद्रोही सलाम !

ग्रंथकार सभेच्या निमंत्रणाला उत्तर म्हणून महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या पत्राला जवळपास १३७ वर्षे झालीत. न्या. रानडे यांच्या पुढाकाराने भरविलेल्या ग्रंथकार सभेच्या संमेलनाला उपस्थित राहण्याच्या निमंत्रणाला महात्मा फुलेंनी उत्तर म्हणून लिहिलेले पत्र, त्यावेळच्या 'ज्ञानोदय' च्या अंकात दि. ११ जून १८८५ ला प्रसिद्ध झाला होते. 
हे उत्तर देताना महात्मा फुलेंनी जी भूमिका स्पष्टपणे मांडली, त्याच भूमिकेतून विद्रोही साहित्य संमेलनाचा जन्म झाला. विद्रोही संमेलनाच्या अगोदरही अनेक साहित्य संमेलने भरवली जात होती. त्यांचीही भूमिका जवळपास फुल्यांचीच होती, पण त्यामध्ये एक महत्त्वाची चूक राहिली, ती म्हणजे अखिल भारतीयवाल्यांनाच स्टेज देणे. फुलेंनी त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटले आहे, 
'आता यापुढे आम्ही शूद्र लोक, आम्हांस फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापांवर भुलणार नाहीत. सारांश, यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादी अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे.' ही भूमिका समजून न घेता, अखिल भारतीयवाले, म्हणजेच फुलेंच्या वेळचे 'ग्रंथकार सभावाले' यांना पुन्हा पुन्हा आपल्या स्टेजवर बोलावणे, ही मोठी चूक होती. 
याच चुकीला फाटा देऊन आणि ‘आमचा आम्हीच विचार केला पाहिजे' या फुलेंच्या भूमिकेतून १९९९ साली धारावीत भरलेल्या पाहिल्या विद्रोही संमेलनापासून विद्रोहीचा महाप्रवाह सुरू झाला. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष थोर दलित साहित्यिक बाबुराव बागूल होते, तर उद्घाटक होते, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे. तिथून सुरू झालेला विद्रोहीचा सांस्कृतिक प्रवाह अनेक धक्के, वाद, मतभेद, टीका पचवत आज नक्कीच एक महाप्रवाह बनलेला आहे. त्याचे १४ वे साहित्य संमेलन पुण्यात होत आहे.
महात्मा फुले म्हणाले होते, 'त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थाशी

आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगवण्याच्या इराद्याने, आम्हांस दास केल्याचे प्रकरण त्यांनी आपल्या बनावट धर्मपुस्तकांत कृत्रिमाने दडपले. याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्हां शूद्रादी अतिशूद्रांना काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात, 
हे त्यांच्यांतील ऊंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणाऱ्यांस कोठून कळणार ?' असे जेव्हा फुले म्हणतात, तेव्हा त्याचा संदर्भ आणि अर्थ हाच असतो की, त्यांच्या स्टेजवरून जी भाषणे होतात, ते जे साहित्य निर्माण करतात, ते आमच्या काहीएक कामाचे नाही, आणि ते लोक आणि त्यांचे स्टेज हे आमच्या लोकांसाठी नाही. 
म्हणूनच विद्रोहीने सुरवातीपासून घेतलेली भूमिका कठोर होती, पण आवश्यक होती. अखिल भारतीयवाल्यांच्या स्टेजवर जाणाऱ्या साहित्यिकांना विद्रोहीचा मंच नाही, ही भूमिका घेणारे विद्रोहीवाले सुरुवातीपासूनच टीकेचे धनी बनले. पण आजही ती भूमिका महत्त्वपूर्ण आहे. 'समरसता मंच' यातूनच निर्माण झाला. आम्हाला पुरोगाम्यांच्या मंडपपण पाहिजे आणि अखिल भारतीयांच्या मंडपात सुद्धा जायचे आहे, अशांना आमच्या कोल्हापुरी भाषेत, 'खोबरं तिकडं चांगभलं' करणारे म्हणतात. 
अशी भूमिका सुरुवातीपासूनच न घेतल्याने विद्रोहीवर अनेक महत्त्वाचे साहित्यिक नाराज होते, पण त्यांची पर्वा न करता, महात्मा फुलेंच्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचे काम विद्रोहीने केलं आहे. याचबरोबर बुद्धाने म्हटल्याप्रमाणे 'माणूस बदलतो' म्हणून त्याला बदलण्याची संधीही दिली पाहिजे, आणि आपली चूक दुरुस्त करण्याची संधीही दिली पाहिजे म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणाने अखिल भारतीयवाल्यांकडे गेलेले, 
पण आपली चूक होती, असे मानणारे अनेक लोक विद्रोहीसोबत आले जोडून घेतले, पण काही लोक विद्रोहीच्या मंचावर आले. आणि संधी मिळताच अखिल भारतीय वाल्यांकडे गेले. त्यामुळे विद्रोहीवर टीका झाली पण विद्रोही नेटाने पुढे वाटचाल करत राहिली.
विद्रोहीचा प्रवाह निव्वळ साहित्य संमेलन घेण्यापुरता राहिला नाही. 'विठ्ठल-रखुमाई मंदिर मुक्ती आंदोलन' म्हणजेच 'बडवे उत्पात हटाव आंदोलन', 'समतेची युगदिंडी' अशा राज्यपातळीवरच्या आणि अनेक स्थानिक पातळीवरच्या कार्यक्रमांद्वारे बहुजनांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा ठळकपणे समोर आणण्याचे काम विद्रोही करत आहे. 
यादरम्यान स्वतःची प्रकाशन संस्था निर्माण करत विद्रोहीने 'सम्यक् विद्रोही' सारखे नियतकालिक आणि दर्जेदार पुस्तकांची निर्मिती केली आहे. यातील काही पुस्तके विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणूनदेखील समाविष्टं झाली आहेत. या सर्व प्रक्रियेमधून विद्रोही हा एक महाप्रवाह बनत चालला आहे.
पूर्णपणे जनतेच्या मदतीवर अवलंबून आलेला, कोणतीही सरकारी मदत किंवा प्रायोजकत्व न घेता, निव्वळ चळवळीच्या बळावर सर्व कार्यक्रम घेत घेत विद्रोहीचा हा सांस्कृतिक महाप्रवाह आपली वाटचाल करत राहील. नेटाने. कष्करी बहुजन माणसांची बाजू मांडणाऱ्या सर्वच साहित्यिक, कलावंतांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून विद्रोहीचा महाप्रवाह आपले काम करत राहील. या विश्वासासह.....!!
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष आयु प्रसेनजीत गायकवाड, कार्याध्यक्ष कॉ धनाजी गुरव, उपाध्यक्ष डॉ बाबुराव गुरव,साथी विजय मांडके नितिन पवार,प्रा गौतम काटकर,प्रा सीमा उसळे सचिव डॉ जालिंदर दिघे सहसचिव गौतम कांबळे, रोहित तेलतूबंडे,स्वन्पिल धांडे प्रवक्ता कॉ अविनाश कदम, खजिनदार प्राचार्य विश्वास सायनाकर,दिपक कोठावळे संघटक प्रा प्रशांत नागांवकर अनुप्रिया कदम
सदस्य वाहरुभाऊ सोनवणे,प्रा विजयकुमार जोके,शिवराम सुके, संतोष पावरा,राजु अडागळे, किरण माळी,रंजना इतर सुभाष पावरा सागर जाधव गणेश खर्डे राहुल पावरा अशोक पावरा चैतन्य पावरा राकेश पावरा सुनिल खर्डे अनेक सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments