मैदानी व मनोरंजनात्मक खेळ आणि वैयक्तिक व सामूहिक नृत्य स्पर्धा
दापोली: दापोली तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या गोल्ड व्हॅलीत नववर्षाच्या स्वागतार्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 1 या दरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या आहेत.मैदानी खेळात क्रिकेट, टेनीस व बॅडमिंटन या खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मनोरंजनात्मक खेळात संगीत खुर्ची,बादलीत चेंडू टाकणे,फुगे फोडणे,निंबू चमचा,बेडूक उड्या इत्यादी मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणा-या मुलांना आकर्षक वस्तूरूप बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.याचबरोबर भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपर गीत, फिल्मी गीत इत्यादी गायन तसेच वैयक्तिक व सामूहिक नृत्य गोल्ड व्हॅलीतील कलाकार सादर करणार आहेत. शेवटी रात्री 12 वाजेपर्यंत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
0 Comments