पालघर:(सौरभ कामडी ) मोखाडा तालुक्यातील
दि.16/12/2022 रोजी सूर्यमाळ येथे आदिवासी विकास हक्क संघर्ष समि ती च्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या पोलिस व वनविभाग भरती बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या वेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ यांनी तरुणांना आवाहन केले आहे की आपण सर्वांनी चिकाटीने प्रयत्न करा, मेहनत घ्या अभ्यास करुन आत्मविश्वास बाळगा नक्कीच पोलिस व वनविभागात भरती व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मोखाडा पोलिस स्टेशन चे निरीक्षक श्री संजय कुमार ब्राम्हणे,खोडाळा RFO श्री महादेव राऊत , पळसुंडे पोलिस व सैन्य भरती प्रशिक्षण संस्थचे मार्गदर्शक श्री श्री तुमडे सर माजी सैनिक,फायर ब्रिगेड चे अधिकारी श्री सुरज पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले व महत्वाच्या सुचना देखील दिल्या.
या कार्यक्रमासाठी सरपंच सौ गीता दशरथ पाटील यांनी विशेष आयोजन केले होते त्यास माजी सरपंच श्री विष्णू हमरे, ग्रामपंचायत सदस्य श्री संजय हमरे, दशरथ पाटील, उज्वला हमरे, संतोष पाटील यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला श्री मंगेश दाते कार्याध्यक्ष,भारत बुधर उपाध्यक्ष, नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री संजय वाघ माजी सरपंच, श्री रघुनाथ पाटील,अक्षय शिंदे, श्री गणेश वाघ पत्रकार, श्री कुशल खादे ग्रामपंचायत सदस्य, श्री सुर्यवंशी ग्रामसेवक, आरोग्य विभाग चे पांडुरंग गवारी सुर्यमाळ आश्रम शाळेचे शिक्षक
उपस्थित होते.
या वेळी मोठ्या संख्येने पोलिस व वनविभाग साठी इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
0 Comments