दिनांक १६/१२/२०२२ रोजी सुर्यमाळ येथे पोलिस भरती व वनविभाग भरती बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले असून आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ यांनी तरुणांना आवाहन केले आहे की आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबाराचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मोखाडा पोलिस स्टेशन चे निरिक्षक श्री संजयकुमार ब्राम्हणे,खोडाळा RFO श्री महादेव राऊत, तसेच पळसुंडे येथील पोलिस व सैन्य भरती प्रशिक्षक माजी सैनिक श्री तुमडे सर हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सुर्यमाळ ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच सौ गीता दशरथ पाटील यांच्या नियोजनातुन केले असून त्यांच्या सोबत श्री संजय हमरे, विष्णू हमरे, दशरथ पाटील, उज्वला हमरे, ग्रामस्थ व आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे सदस्य यांनी पुढाकार घेऊन सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे.
0 Comments