Advertisement

कोडीद येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत सिकल सेल तपासणी शिबिर संपन्न

महाराष्ट्र शासन 'आरोग्य विभाग' नियोजित ११ ते १७ डिसेंबर "सिकलसेल नियंत्रण सप्ताह निमित्ताने प्रा.आ.केंद्र बोराडी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे सिकल सेल निदान तसापणी शिबीर आयोजित करण्यात आले. ह्यावेळी सिकल सेल आजाराबद्दल सखोल माहिती मार्गदर्शन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी दिली.
    ह्यावेळी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.ध्रुवराज वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, तालुका सिकल सेल समन्वयक ऋषिराज महाजन, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी पंकज चव्हाण, तालुका आशा समन्वयक सुहास चव्हाण, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा, आशा सेविका अलका पाटील, तारकीबाई पावरा तसेच सर्व आरोग्य टीम व शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याद्यापक श्री.व्ही.डी.पाटील सर व सर्व शिक्षक वृंद व सर्व कर्मचारी ह्यांच्या समन्वयक टीम आदी ह्यांनी ह्या शिबिराचे आयोजनासाठी मेहनत घेतली.
    ह्यावेळी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सर्वांचे आभार मानले व सिकल सेल नियंत्रण सप्ताह निमित्ताने शाळेतील सर्वच विद्यार्थी ह्यांचे सर्वांची सिकल सेल तपासणी करण्याचे नियोजन सांगितले.

Post a Comment

0 Comments