Advertisement

पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी सोमनाथ टोकरे यांची निवड.


 पालघर प्रतिनिधी-सौरभ कामडी 


न दैन्यम न पलयानम ब्रिदवाक्य घेऊन घेऊन पत्रकारांचे न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यता प्राप्त पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व उपाध्यक्ष राम खुर्दळ यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज कामडी यांच्या उपस्थितीत जव्हार येथे आज पालघर जिल्हा व तालूका कार्यकारणी सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ही नोंदणीकृत पत्रकारसंघटना असून पत्रकार बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत आहे तसेच या संघटनेचे नियम व उद्देश सांगितले तसेच पत्रकार यांच्या व कुटूंबियांच्या समस्या अडचणी सहकार्याच्या भावनेतून सोडवण्याचा प्रयत्न कराल असे मत मांडले तसेच समितीने जी जबाबदारी आपणावर सोपवली आहे ती एक निष्ठेने पार पाडाल अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर उपस्थित सर्व ग्रामीण पत्रकार बांधवांनी  आपल्या आपल्या पत्रकारिता करीत असताना येणाऱ्या समस्या सांगितल्या तसेच ग्रामीण भागात पत्रकार म्हणून काम करीत असताना अनेक समस्या येत असतात या समस्या पत्रकार संरक्षण समिती मार्फत कशा दूर होतील याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. सदर सभेमध्ये आज जिल्हा व तालूका कार्यकारणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदी सोमनाथ टोकरे, सचिव पदी हेमंत घाटाळ,संघटक पदी प्रदीप कामडी ,जव्हार तालूका अध्यक्ष पदी प्रमोद  मौळे, उपाध्यक्ष पदी सुनील जाबर, व विक्रमगड तालूका अध्यक्ष पदी दीपक भोये, सचिव पदी प्रशांत दाव्हाड यांची निवड करून जिल्हाध्यक्ष मनोज कामडी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. जास्तीत जास्त पत्रकार संरक्षण समितीचे कार्य तळागाळातील पत्रकार बांधवापर्यत पोचवू असे नवनिर्वाचित कार्यकारणी यांनी सांगितले. तसेच यावेळी नवीन सभासद यांची नोंदणी करण्यात आली. उपस्थित सर्व पत्रकार यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments