ममदापूर ठाकूरवाडी व आखाडवाडी,ता.कर्जत, जि.रायगड या आदिवासी वाडीतील लोकांनी,पिण्याच्या पाण्यासाठी दि.८ डिसेंबर २०२२ पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.पेयजल योजनेचे काम पूर्ण होवूनही,आमच्या आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.स्थानिक आदिवासी लोकांचा पाणी प्रश्न दिवसेन दिवस गहन होत चालला असताना पाणी प्रश्न सोडविणेसाठी संबंधित ग्रामपंचायतीवर जन आक्रोश,हंडा मोर्चा काढला होता.त्यावेळेस पत्रकार बंधू,भगिनी यांच्या समक्ष ग्रुप ग्राम पंचायत ममदापूर पदाधिकारी,ग्रामसेवक यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत,आपल्या आदिवासी वाड्यांना अधिक दाबाने पिण्याचे पाणी सुरळीत केले जाईल असे आश्वासन दिले होते.सदर आश्वासनाअंती सदर मोर्चाची सांगता करण्यात आली होती.
परंतु अद्यापही जैसे थे ! अशी अवस्था असल्यामुळे, आमच्या आदिवासी बांधवांचा विश्वासघात झाला असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे सदर आदिवासी बांधवांनी सुरू केलेलं साखळी उपोषण अधिक तीव्र होत चालले होते.पेयजल योजनेचे काम पूर्ण होवूनही स्थानिक आदिवासी बांधवांना त्याचा लाभ मिळत नसून धनदांडग्या बिल्डर लॉबीला अनधिकृतपणे पाणी पुरवले जात असल्यामुळे आम्हाला पिण्याचे पाणी मिळत नाही ! असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप होता.आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही साखळी उपोषणाचे रूपांतरण अमरण उपोषणामध्ये करणार आहोत.प्रसंगी पाण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करण्यासही मागे सरसवणार नाही असे प्रशासनास ठणकावून सांगितले होते.संबंधित कार्यालयाला निवेदने सादर केल्यानंतर उपोषणाला यश प्राप्त झाले आहे.
दुसऱ्या दिवशी पाण्याचा पुरवठा व पाण्याच्या दाबाची पहाणी करून ग्रामस्थ उपोषणाची सांगता करणार आहेत.सदर उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आदिवासी समाजसेविका कविताताई निरगुडे/हंबीर सह विविध संघटनांचे पदाधिकारी आदि.चेतन बांगारे(बिरसा क्रांती दल ठाणे जिल्हा अध्यक्ष)प्रकाश शिद,अनंता हंबीर,एकनाथ वारघडे,पंडित पारधी,सांज वाघ,भगवान ठोंबरे,संगीता निरगुडे व अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.
*आदि.कविता निरगुडे/हंबीर(आदिवासी महिला समाजसेविका)*
0 Comments