सुशिलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी उतरणार मैदान
दापोली: दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी बिरसा फायटर्स शाखा राहता जिल्हा अहमदनगरच्या वतीने पुणतांबा रस्तापूर येथील बेघर आदिवासी भिल्ल कुटुंबांना जमीन व घरकुले मिळावीत,या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता आंदोलन होणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आझाद मैदान मुंबई यांना दिपक माळी यांनी याबाबत निवेदन सादर केले आहे.35 ते 40 वर्षापासून कसत असलेली सरकारी पडीत जमीन आमची आम्हाला परत मिळावी व त्याच जमीनीवर घरकुले मिळावीत,अशी मागणी करण्यात आली आहे.या आंदोलनाला 100 पेक्षा अधिक आंदोलन कर्ते पुणतांबा रस्तापूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथून शामिल होणार आहेत.
पुणतांबा रस्तापूर येथील बेघर आदिवासी भिल्ल कुटुंबांना जमीन व घरकुल मिळावीत, या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर समोर आंदोलन केले होते.त्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांना याबाबत तातडीने कार्यवाहीबाबत कळविले होते.त्यानंतर बिरसा फायटर्स संघटनेकडून या मागणीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू होता.सरकार मागणीकडे लक्ष देत नाही,म्हणून आता पुणतांबा रस्तापूर बिरसा फायटर्स शाखेने हे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्याचे ठरविले आहे.सुशिलकुमार पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलना बोगस आदिवासींना सेवासंरक्षण देऊ नका व आदिवासी समाजासंबंधित विविध विषयांवर मंत्रालयात निवेदन देण्यात येणार आहेत. आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी शामिल व्हावे ,असे आवाहन बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आले आहे.
0 Comments