Advertisement

शिंदखेडा येथे जननायक रॉबिन हूड टंट्या मामा भील यांच्या 4 डिसेंबर 1889 रोजी स्मृतिदिनानिमित्ताने प्रतिमापूजन केले

"जननायक तंट्या भिल" 4 डिसें 1889 शहिद दिवस
 उद्घाटन - प्रवीणजी शिरसाठ प्रतिमापूजन - रामनाथ दादा मालचे सुरेश सोनवणे दिपक मोरे सर..
विर एकलव्य नगर शिंदखेडा येथे 4 डिसें रोजी "जननायक तंट्या भिल" शहीद दिवस निमित्त त्यांच्या इतिहास आदिवासी समाज बांधवांसमोर मांडला 1857 च्या काळात इंग्रज सरकारने मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जल जंगल जमिनीवर ताबा मिळवला व त्यांच्या उपजीविकेचे साधन हरवून घेतले,
 म्हणून मोठ्या प्रमाणात इंग्रजांबद्दल असंतोष निर्माण झाला देशात सावकार जमीनदार यांनी आर्थिक पिळवणूक सुरू केली. त्याच बरोबर वरून इंग्रज सरकारने हि जल जंगल जमिनीवर ताबा मिळवला यामुळे बेघर होण्याची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे उद्रेक होऊन जननायक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. जमीनदार सावकारांकडून परत जमिनी मिळून देणे सुरू केले. इंग्रजांना ही आदिवासी समाजापासून दूर ठेवले अशामुळे मोठ्या प्रमाणात "जननायक म्हणून तंट्या भिल" यांची लोकप्रियता वाढली व भांडण तंटे मिटवणे सुरू केले. अशामुळेच इंग्रजांना त्यांची भीती येऊन त्यांना पकडून 4 डिसें 1889 च्या दिवशी जबलपूर येथे फाशी दिली.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनाथ दादा मालचे यांनी "जननायक तंट्या भिल" यांच्या इतिहास सांगून व दीपक मोरे सर यांनी क्रांतिवीर यांच्या इतिहास मांडून समाज बांधवांनी त्यांच्या आदर्श घ्यावे असे संबोधले...
 यावेळी तालुका- सचिव गुलाब सोनवणे उपसचिव - भूपेंद्र देवरे, बाबूलाल महाराज, रवींद्र चव्हाण सुनील मोरे, दीपक फुले, अजय मालचे, अर्जुन सोनवणे, जिभाऊ फुले शाना भाऊ सोनवणे, गुलाबसिंग सोनवणे, युवराज महाराज, सचिन मालचे, विनोद सोनवणे, ज्ञानेश्वर भिल, संजय ठाकरे, वसंत महाराज शांतीलाल महाराज, अशोक महाराज इ. मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते..
 जननायक यांच्या इतिहास ऐकून आदिवासी समाज बांधव प्रश्न उपस्थित करू लागले की आतापर्यंत आपल्या भिल समाजाचा इतिहास व क्रांतिवीरांच्या इतिहास शालेय पाठ्यपुस्तक क्रमांत आला का नाही ? याचे त्यांना आश्चर्य वाटले..
जय भिलवंश जय एकलव्य जय आदिवासी

Post a Comment

0 Comments