Advertisement

कालीबेल येथील आदिवासी मजुराच्या खूनाच्या गुन्ह्याची CBI मार्फत चौकशीची बिरसा फायटर्सची मागणी

आरोपींना पोलीस निरीक्षक मनमाड व डाॅक्टर यांनी मदत केल्याचा आरोप 

पोलीस निरीक्षक गीते व डाॅक्टर लता वेडेकर यांचे गुन्ह्यासंबंधीत पुरावे उघड

धडगांव:मयत ईश्वर सीपा वळवी रा. कालीबेल तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार यांचा मनमाड येथे झालेल्या संशयास्पद खूनाच्या गुन्ह्याची CBI मार्फत सखोल चौकशी होऊन फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणा-या,फिर्याद न घेणा-या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या,खोटे बोलून आरोपींस गुन्ह्यात मदत करणा-या श्री.गीते पोलीस निरीक्षक मनमाड व डाॅ.लता वेडेकर वैद्यकीय अधिक्षिका मनमाड यांच्यावर तसेच गुन्ह्यासंबंधीत आरोपींवर कायदेशीर गुन्हा नोंद करून शिक्षा करावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस अधीक्षक नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
               निवेदनात म्हटले आहे की, सागर सिपा वळवी रा.कालीबेल ता.धडगांव जि.नंदुरबार मयतचा भाऊ यांचा बिरसा फायटर्स धडगांव शाखेकडे दिनांक 11/11/2022 रोजी तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.घटनेची सविस्तर माहितीसाठी निवेदनासोबत अर्ज जोडत आहोत.तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिनांक 16/11/2022 रोजी मनमाड पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार अर्जातील घटनेची सविस्तर माहिती कर्तव्यावर असणा-या ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक यांना सांगितली. तेव्हा ठाणे अंमलदार यांनी आमचे PSI सरांशी बोला म्हणून पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे फोन दिला.सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले की, आपल्या मनमाड पोलीस ठाणे हद्दीत ईश्वर सीपा वळवी यांचा खून झालेला आहे.त्याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी मयतचे family members नातेवाईक तुमच्या पोलीस ठाण्यात आले होते,परंतु मनमाड पोलीसांनी त्यांची तक्रार घेतली नाही.तेव्हा पोलीस उपनिरीक्षक बोलले की,एवढा सिरीयस गुन्हा आहे तर तक्रार घेणारच ना!तक्रार घेतली नाही असं होऊ शकत नाही.तरी मला या घटनेसंबंधी कल्पना नाही आहे.तेव्हा मी तुम्हाला आमचे PI साहेबांचा नंबर देतो,सगळ्या गोष्टी PI साहेबांना माहिती असतात, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या,असे सांगत पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस निरीक्षक श्री.गीते यांचा मोबाईल नंबर दिला.
                       सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस निरीक्षक मनमाड श्री. गीते यांना या नंबर वर फोन केला व ईश्वर सीपा वळवी रा.कालीबेल ता.धडगांव जि.नंदुरबार यांचा मनमाड पोलीस ठाणे हद्दीत खून झाला आहे ,तरी तुम्ही खूनाचा गुन्हा नोंदवला नाही,अशी नातेवाईकांची तक्रार आहे.त्यावर पोलीस निरीक्षक श्री.गीते म्हणाले की,त्याने स्वतःच फाशी घेतली आहे, तेव्हा मर्डरचा गुन्हा दाखल कसा होईल? तिथे सी सी टिव्ही आहे,तो स्वतःच चालत येतो आणि त्याने स्वतः पहाटेच्या वेळी फाशी घेतली आहे,तसे सी सी टिव्ही फुटेज आहे.त्याचा PM रिपोर्ट आहे,PM च्या डाॅक्टरांचाही रिपोर्ट आहे की,त्याने फाशी घेतलेली आहे.
आपल्याकडे त्याचे PM नोट्स आहेत. PM रिपोर्ट आपल्याकडे आहे.आत्महत्या केलेली आहे,फाशी घेतलेली आणि दिलेली नाही.याचा मनका तुटलेला आहे.याचे V ट्रॅन्गुलेशन आलेलं आहे.O ट्रन्गुलेशन नाही.त्याला उचलून न्यायचा गुन्हा एक तर तुमच्या नंदुरबार मध्ये नोंद व्हायला पाहिजे आणि मारहाण टाॅर्चर केल्याचा गुन्हा पंढरमध्ये नोंद व्हायला पाहिजे.या दोन्ही ठिकाणी तो गुन्हा नोंद नाही आहे.त्याने मनमाडमध्ये रस्त्याच्या ठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आमच्याकडे आत्महत्या केल्याचा ED दाखल आहे.हा मयत माणूस कुठला आहे ते माहित नाय,त्याला मारणारे कोण ते माहित नाय,पोलिसांचा रोल कसा राहील?तक्रारदार यांना पाठवून द्या,तक्रार घेतो.अशी फोनवर दिनांक 16/11/2022 रोजी पोलीस निरीक्षक मनमाड श्री.गीते यांनी सुशिलकुमार पावरा यांना माहिती दिली.
               त्यानुसार दिनांक 23/11/2022 रोजी मयतचा भाऊ सागर सीपा वळवी व नातेवाईक पोलीस ठाणे मनमाड येथे खुनाची फिर्याद दाखल करण्यासाठी आले असता पोलीस निरीक्षक मनमाड श्री.गीते व पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तक्रारदारांना दिवसभर पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले , रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी मनमाड यांच्या कार्यालयात पाठवले,रात्र झाली तरी तक्रार घेतली नाही,PM रिपोर्ट डाॅक्टर कडून आणा. असं म्हणत फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली.
                 पोलीस निरीक्षक मनमाड श्री.गीते यांनी नातेवाईकांना तशी खुनाची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यास सांगा,आम्ही फिर्याद घेतो,असे सुशिलकुमार पावरा यांना फोनवर बोलले.फिर्याद देणारे तक्रारदार पोलीस ठाणे मनमाड येथे आल्यानंतर फिर्याद घेण्यास पुन्हा टाळाटाळ केली.सी सी टिव्ही फुटेज आम्ही बस स्टॅन्ड वाल्यांना मागितली तर बस स्टॅन्ड वाल्यांनी तसं लेखी दिलं आहे की,साहेब त्या काळामध्ये इथं लाईट गेली,आम्ही एमसीबी वाल्यांना सुद्धा विचारलं ,तेव्हा एमसीबी वाल्यांनी सुद्धा आम्हाला सांगितल की,या काळात तिथली लाईट गेलेली आहे.जर तपासात खून निष्पन्न झाला तर मर्डरचा गुन्हा दाखल करू.302 चा गुन्हा दाखल करायचा झाला तर अगोदर तपास करावा लागेल, त्याच्या अंगावर जखमा असतील तर खूनाचा गुन्हा दाखल होतो.असे पोलीस निरीक्षक बोलले. खुनाचा गुन्हा दाखल करा,ही विनंती आहे तुम्हाला ,अशी विनंती सुशिलकुमार पावरा यांनी केल्यानंतर पोलीस निरीक्षक गीते यांनी गुन्हा दाखल करतो हा! करतो! म्हणून दिनांक 23/11/2022 रोजी फोन ठेवला.
                    दुस-या दिवशी दिनांक 24/11/2022 रोजी PM रिपोर्ट घेण्यासाठी सागर सीपा वळवी व नातेवाईक सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर डाॅक्टर लता वेडेकर यांनी PM रिपोर्ट देण्यास सुद्धा टाळाटाळ केली.त्यानंतर सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी फोन केल्यावर डाॅक्टर लता वेडेकर म्हणाल्या की,मी PM केलं आणि मेडीटेशन ला गेली होते 12 दिवस, मी गावालाही गेली नव्हती म्हणजे इतका उशीर केला नसता,मेडीटेशन म्हणजे 12 दिवस मोबाईल सुद्धा बंद असतात, माझ 2 महिन्यापूर्वीच बुकींग होत, आणि याची मला कल्पनाच नव्हती सगळ्या गोष्टींची,मी काल जाईन झाले,काल आल्या आल्या मला दुपार नंतर 4-5 वाजता समजल की, असं असं PM रिपोर्ट पाहिजे,तेव्हा मी पंचनामा घरीच ठेवून आले होते,तर मग तो आज मी मागवलाय, ओपीडी संपल्यावर मी स्वतः PM रिपोर्ट बनवते आणि देऊन टाकते.मी 3 वाजेपर्यंत देते,मी स्वतःच पोलिसांना फोन करते व हॅन्डवर करते काहीच प्रॉब्लेम नाही,मी रिपोर्ट बनवते व त्यांना देते.मी सुट्टीवर असल्यामुळे त्यांना PM रिपोर्ट देता आला नाही ,नाहीतर तर त्यांना अगोदरच रिपोर्ट दिला गेला असता.मी आता रिपोर्ट बनवते व देते.मी दवाखान्यात नव्हतेच कालच जाईन झाले,तुम्ही बघू शकता.मी रिपोर्ट देते.असे डाॅक्टर लता वेडेकर ह्या दिनांक 24/11/2022 रोजी फोनवर बोलल्या.
               डाॅक्टर लता वेडेकर यांनी दिनांक 24/11/2022 रोजी खोटा PM रिपोर्ट बनवला आहे व PM रिपोर्ट वर 5/11/2022 रोजीची तारीख टाकली आहे.मी 12 दिवस मेडीटेशन रजेवर होते व पंचनामा घरीच ठेवून आले.आज मी तो मागवलाय,मी स्वतः PM रिपोर्ट बनवते व देते.डाॅक्टर लता वेडेकर यांच्या अशा संभाषणातून यापूर्वी घटनेचा PM रिपोर्ट बनवला नव्हता,PM रिपोर्ट दिनांक 24/11/2022 रोजी बनवला व त्यावर मागील तारीख 5/11/2022 टाकली.तसेच एवढ्या सिरीयस प्रकरणाचा पंचनामा घरीच ठेवून आले आहे,असे डाॅक्टर लता वेडेकर यांचे म्हणणे आहे,या कृत्यातून त्यांचा कामातला हलगर्जीपणा व बेजबाबदार पणा दिसून येतो.तसेच दिनांक 24/11/2022 रोजी खोटा PM रिपोर्ट बनवून दिला हे स्पष्ट होते.म्हणजेच डाॅक्टर लता वेडेकर यांनी 12 दिवस मेडीटेशनला गेले,घरी गांवी गेले,घरात पंचनामा ठेवून आले,व खोटा रिपोर्ट बनवून खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना वाचवण्यासाठी आरोपींना व पोलिसांना मदत केलेली आहे,हे दिसून येते.
                      पोलीस निरीक्षक श्री. गीते यांनी सुद्धा 16/11/2022 रोजी तक्रारदारांची फिर्याद घेतली नाही,घटनेची पहिली खबर नोंदवली नाही,आधी मयत ईश्वर सीपा वळवी यांनी स्वतः आत्महत्या केली आहे,फाशी घेतली आहे,तसे सी सी टिव्ही फुटेज आमच्याकडे आहेत,तसा PM रिपोर्ट आहे,असे खोटे बोलून दिनांक 23/11/2022 रोजी मात्र आमच्याकडे सी सी टिव्ही फुटेज नाहीत, लाईट गेली होती,PM रिपोर्ट सुद्धा नाही,अशा संभाषणातून पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा गुन्हेगारांना आरोपींना वाचवण्यासाठी तक्रारदार यांची फिर्याद घेतली नाही,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला,खोटे बोलून आरोपींना गुन्ह्यात मदत केलेली आहे,हे स्पष्ट दिसून येते.
          एकंदरीत पोलीस निरीक्षक श्री. गीते यांच्याकडून तक्रारदारांची फिर्याद न घेणे,फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणे,सी सी टिव्ही फुटेज नष्ट करणे,खोटे बोलणे व डाॅक्टर लता रेडेकर यांचे 12 दिवस मेडीटेशन रजेवर जाणे,घरीच पंचनामा ठेवून येणे,PM रिपोर्ट देण्यास दिरंगाई करणे, दिनांक 24/11/2022 रोजी PM रिपोर्ट बनवणे व त्यावर 5/11/2022 तारीख टाकणे, यातून पोलीस निरीक्षक मनमाड श्री.गीते व डाॅक्टर लता वेडेकर यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे का?एवढे गंभीर प्रकरण असताना पोलिसांनी फिर्याद का घेतली नाही?सी सी टिव्ही फुटेजचे काय केले?डाॅक्टरने PM रिपोर्ट देण्यास टाळाटाळ व दिरंगाई का केली?याची CBI मार्फत निःपक्ष पणे सखोल चौकशी करण्यात यावी.पोलीस निरीक्षक मनमाड श्री.गीते व डाॅक्टर लता वेडेकर यांनी खोटे बोलून गुन्ह्याला मदत केली आहे.म्हणून तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे की,गुन्हेगारांना व गुन्हेगारांना मदत करणा-या पोलीस निरीक्षक मनमाड, पोलिसांना व डाॅक्टर लता वेडेकर यांना कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षा करण्यात यावी.
                श्री.गीते पोलीस निरीक्षक मनमाड व डाॅक्टर लता वेडेकर यांच्यासंबंधीत पुरावे ,रेकॉर्डिंग आवश्यक त्या कायदेशीर कामासाठी व कार्यवाहीसाठी पुरावे म्हणून जतन करून ठेवण्यात आले आहेत. 
              मयत ईश्वर सीपा वळवी यांचा खूनच झाला आहे म्हणून मयताचे शरीरावर अजूनही अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत, शरीर जाळण्यात आले नाही.शरीर मिठात पुरुन ठेवण्यात आले आहे.म्हणून लवकरात लवकर या प्रकरणाची CBI मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी,पुनश्चा CBI मार्फत PM करण्यात यावा व आरोपींना व आरोपींना मदत करणा-यांना कायदेशीर शिक्षा करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस महासंचालक व पोलीस अधिक्षक नाशिक यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments