Advertisement

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील झलकारीबाई एक महान क्रांतिवीरांगणा..

*लेखक:-राजेंद्र पाडवी महासचिव बिरसा फायटर्स महा,राज्य*
            
रणरागिणी झलकारीबाई यांच्या जन्म २२ नोव्हेंबर १८३० मध्ये झाशी जिल्ह्यातील भोजना या गावी सदोबा अहिरवार कोरी आदिवासी परिवारात झाला.तिच्या वडिलांचे नाव मूलचंद तर आईचे नाव धनिया होते.सन १८ ४३ मध्ये झलकारीबाईचा विवाह पूरण जतादिया कोरीबरोबर झाला. झलकारीबाई आपल्या पतीसमवेत राणी लक्ष्मीबाईच्या राजमहालात जात असत.पुढे वीरांगणा झलकारीबाईना सैनिकी अभ्यास करण्याची इच्छा झाली.म्हणून प्रथम आपल्या पतीलाच गुरू मानून त्यांच्याकडून सैनिकी शिक्षण घेणे घरीच सुरू केले.त्यात तलवारबाजी, बंदूक निशाणेबाजी,घोड्यावर स्वार होणे,घोड्यांना नियंत्रणात आणणे, भालाफेक,शत्रूने हल्ले केलेले चुकविणे,शत्रूवर हल्ले करणे इत्यादी या सैनिकी शिक्षणात झलकारीबाईनी कालांतराने प्राविण्य मिळविले.
             २० मार्च १८५८ मध्ये इंग्रजांनी झाशीला वेढा घातला व हल्ला केला.प्रचंड संहार झाला. झलकारीबाई यांना एकच चिंता होती ती म्हणजे महाराणी लक्ष्मीबाई या इंग्रजांच्या हाती लागायला नको.जर त्या इंग्रजांच्या हाती लागल्या तर इंग्रज विजयी झाल्याचे जाहीर करतील.झलकारीबाई आणि पूरण शत्रुवर प्रचंड हल्ले करीत होते.झलकारीबाईनी आपले कपडे राणी लक्ष्मीबाई यांना दिले.आणि राणी लक्ष्मीबाई यांनी झलकारीबाईचे कपडे परिधान केले.जेणेकरून लक्ष्मीबाईंनी किल्ला सोडल्याचे इंग्रजांना लवकर समजू नये. झलकारीबाईचा चेहरा आणि व्यक्तिमत्त्व राणी लक्ष्मीबाईच्या व्यक्तिमत्त्व।शी मिळते जुळते होते. याचा फायदा घेऊन झलकारीबाईने संपूर्ण दिवस इंग्रज सैनिकांना गोंधळात टाकले.इंग्रज सुध्दा झलकारीबाईस राणी लक्ष्मीबाई समजून दिवसभर लढत होते.या चकमकी दरम्यान तिचा पती पूरण कोरी मातूभूमीसाठी शहीद झाला. त्यांच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेऊन पुन्हा घोड्यावर स्वार इंग्रजांच्या सैन्यांवर तुटून पडल्या.विजेसमान तलवार चकाकत होती.अचानक सुसाट वेगाने एका गोळीने तिचा वेध घेतला.झलकारीबाई घोडयावरून खाली पडल्या.आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी,स्वातंत्र्यसाठी व आपल्या प्रिय महाराणी लक्ष्मीबाईकरिता झलकारीबाई ४ जून १८५८ रोजी अजरामर झाल्या.
        आजही बुंदलखंडामध्ये वीरांगणा झलकारीबाईकडे आपल्या अस्मितेचे एक महत्त्वाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यांनी केलेल्या पराक्रमी कृत्यांची भरपूर वर्णने बुंदलखंडातील लोकसाहित्यामध्ये आहेत.ही वर्णने आजच्या पिढीला साहसीच्या,मनोधैयांच्या आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणा देणारी आहेत. केंद्र सरकारने २००१ साली त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले. रायबरेली आणि अजमेर येथे वीरांगणा झलकारीबाई यांची भव्य पुतळे उभारण्यात आली आहे.अशा पराक्रमी वीरांगणा झलकारीबाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐💐💐💐💐
       ✍️राजेंद्र पाडवी,राज्यमहासचिव बिरसा फायटर्स

Post a Comment

0 Comments